राज्यात घडणाऱ्या घडामोडींबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठा निर्णय घेणार असल्याच बोललं जातं आहे. यामुळे अनेक प्रश्न सध्या निर्माण होतं आहेत. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (आज) मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार का? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांनी तातडीची मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे कोणता मोठा निर्णय घेणार? याकडे सध्या राजकीय वर्तुळासह राज्याचे देखील लक्ष लागले आहे. आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना प्रचंड मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.
शिवसेनेने आपल्या हालचाली वाढवल्या आणि इतर आमदारांना सुरत येथे जाण्यापासून रोखले. त्यातच दुसरीकडे एकनाथ शिंदे आमदारांसह गुजरातहून आसामला दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार, त्यांचे पीए असे एकूण ६५ जण असल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे या सर्व राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी मोठं व्यक्तव्य केलं आहे. ‘शिवसेना पुन्हा संघर्षाने उभी करु’, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यामुळे बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक नारा दिला आहे.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनेचा जन्मच मुळात संघर्षातून झाला आहे. त्यामुळं अनेक संघर्ष शिवसेनेने पाहिले आहेत. आताही संघर्ष करू आणि पुन्हा संघर्षाने शिवसेना उभी करू. मी आतापर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, काल देखील मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या बंडखोरीवर भाष्य केलं होतं. ‘तुमचं काही नाही, माझं काही नाही तर जायचं कशाला? आता बोलत आहेत की, भाजपसोबत चला… जेव्हा भाजपसोबत होतो तेव्हा आपल्याला कमी त्रास झाला का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना विचारला.
महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकार कोसळणार? ‘संपर्कात रहा! कोणत्याही क्षणी मुंबईत यावे लागेल,’ भाजपाचे आमदारांना तातडीचे आदेश
शिवसेनेला धक्का! उद्धव ठाकरेंच्या सर्वात जवळचा आमदार शिंदेंच्या गोटात; रात्रीतून सुरतला पलायन
भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा; कोण आहेत द्रौपदी मुर्मू? जाणून घ्या..
गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच साधला पत्रकारांशी संवाद, पहा नक्की काय म्हणाले?