शनिवारी पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निघालेल्या सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. (uddhav thackeray behind attacks by me says kirit somaiya)
त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या पायरीवर पडले. जेव्हा ते पडले तेव्हा त्यांच्या माकडहाडाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
या घटनेवरून शिवसेना – भाजपमध्ये आणखी एक वादाची ठिणगी पडली आहे. माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशनानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोव्हिड सेंटर प्रकरणाची चौकशी झाली तर उद्धव ठाकरेंना जाब विचारला जाईल आणि त्यांना याचं उत्तर देणं भारी पडणार आहे. तीन लोकांवर सुजित पाटकर, संजय राऊत आणि ऑर्डर देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करावा लागणार असल्याचं सोमय्या यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
तसेच ‘येत्या गुरुवारी मी दिल्लीत जाणार आहे. राष्ट्रीय डिझास्टरचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करणार आहे. तसेच उद्या रत्नागिरीला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचा बंगला पाडला की नाही याचा फॉलोअप घेण्यासाठी मी रत्नागिरीला जाणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितले आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेचा निषेध करत शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, किरीट सोमय्यांवर हा भ्याड हल्ला होता. या व्हिडीओवरून असं दिसतंय की हा सोमय्या यांच्यावरील सुनियोजित प्राणघातक हल्ला होता. सोमय्यांना ठार मारण्याचा सेनेचा प्लॅन होता. किंबहुना शिवसेनेनं आज सोमय्या यांना ठार मारण्याचाच प्लॅन होता असं या हल्ल्याच्या क्लिपींग वरून दिसतंय, असा दावाही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा कोर्टात स्वत: दिलीप कुमार यांनी लढली होती लता मंगेशकर यांची केस; म्हणाले, ‘ताई चिंता नको करू’
…त्यामुळे मजरूह सुल्तानपुरी लतादीदींचे जेवण स्वत: चाखायचे, कारण वाचून हादरा बसेल
एकदा लता मंगेशकर यांना एका व्यक्तीने दिले होते विष, मरता मरता वाचल्या होत्या दीदी, वाचा किस्सा
‘भिकारी समजून मत द्या’, काँग्रेस उमेदवाराची मतदारांना अजब मागणी