शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड अखेर यशस्वी झालं. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिंदेशाही सरकार स्थापन झालं आहे. तर दुसरीकडे अडीच वर्ष विरोधी बाकावर असलेल भाजप आता शिंदे यांच्या बंडामुळे सत्तेत आलं आहे. राज्यात सत्तांतर झालं आहे.
शिंदे यांनी केलेल्या बंडापासून दहा दिवस राज्यात नाट्यमय घटना घडताना पाहायला मिळाल्या. राज्यातील राजकारणाचे पडसाद सोशल मिडियावर देखील उमटले. राज्यात सत्तानाट्य रंगलेलं असताना पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा कोण करणार यावरुन चर्चा रंगली होती.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा सुरू असताना अचानक शिंदे मुख्यमंत्री पदावर आले. शिंदे महापूजा ते करणार यावर शिक्कामोर्तब झालं. तर आता याबद्दल उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे. ते आज मुंबई येथे पत्रकार परिषदेदरम्यान याबाबत बोलत होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे की, वारकऱ्यांनी मला पंढरपूरला येण्याची विनंती केली आहे. मात्र या गदारोळात मी पंढरपूरला जाणार नाही. पण मी वारकऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार हा गदारोळ आटोपल्यानंतर मी पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनाला जाणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे की, ‘आषाढी एकादशी जवळ आली आहे. हजारो जण पंढरपूरला पोहचत आहेत. मलाही निमंत्रण आलं आहे. नंतर मी पंढरपूरल जाईल, नंतर दर्शन घेईन. मातोश्रीवर जनतेचे लोढेंच्या लोंढे येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रु आहेत.’
‘मी बोलणार आहे, बोलत राहीन, पण सैनिकांच्या मनावर दडपण वाढेल असं बोलणार नाही. हे. हजारो जण पंढरपूरला पोहचत आहेत. मलाही निमंत्रण आलं आहे. नंतर मी पंढरपूरल जाईल, नंतर दर्शन घेईन,’ असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. पुढे बोलताना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
‘कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघुन मतदान करतात. नवीन चिन्हांचा विचार करत नाही हे मुद्दामून तुम्हाला सांगत आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
२५ पैशांची जुनी नाणी रातोरात बदलू शकतात तुमचं भविष्य; १ मिनिटात होऊ शकता लखपती, कसं ते जाणून घ्या
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री मैदानात, मोदींना घातलं साकडं
‘घरात घुसून मारलं होतं ना..’; या बॉलिवूड दिग्दर्शकावर संतापली कंगना राणावत
जबरदस्त प्रेमकहाणी आणि सुपरहिट ऍक्शन, वाचा थॉर: लव्ह ऍन्ड थंडरचा रिव्ह्यु