Share

धोका देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे सध्या हे आसाममध्ये तळ ठोकून आहेत. (uddhav thackeray angry on eknath shinde)

एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहे.

अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांसोबत ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला टोला लगावला आहे. धोका देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या मुलावरुनही सुनावले आहे. तुम्हाला कॅबिनेट मंत्री केलं, तुमच्या मुलाला खासदारकी दिली आणि माझ्या मुलाला मी काही दिलं तरी तुम्हाला अयोग्य वाटतंय, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच मी आताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. तसेच त्यांनी शिवसेनाप्रमुख पदाबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. जर तुम्हाला वाटत असेल, तर मी पक्षप्रमुखाचाही राजीनामा द्यायला तयार आहे. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे हे विसरुन जा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आज मी मनमोकळं करतोय. मला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाहीये. त्यामुळे मी वर्षा सोडलीये. तसेच मला झोपेतही विचारलं की वर्षा की मातोश्री तरी मी मातोश्रीच सांगेन. तसेच जे सोडून गेले ते माझे कधीच नव्हते, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज्यपालांना विधीमंडळात हस्तक्षेप करता येणार नाही; बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द होणार
शिवसेना आणि ठाकरे नाव न लावता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आव्हान
शिवसेनेच्या ९२ वर्षांच्या फायर ब्रँड आजी मुख्यमंत्र्यांसाठी मैदानात; म्हणाल्या, तो रिक्षावाला…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now