शिवसेनेतील नाराजी नाट्य अद्यापही थांबण्याच नाव घेत नाहीये. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. महत्वाची बाब म्हणजे एक – दोन नव्हे तर तब्बल शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले आहेत.
शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.तर आता शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत असल्याच संकेत मिळाले आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे लोकसभेतील खासदार अनुपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला शिवसेनेचे लोकसभेतील 18 पैकी 10 खासदार उपस्थित होते. शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामील झाल्याच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर खासदारांच्या गैरहजेरीमुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, आजच्या मातोश्रीवर आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीत गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे मातोश्रीवर दाखल झालेत. त्यात लोकसभेतले 10 खासदार दाखल झाल्याची माहिती हाती येत आहे.
कोण – कोण बैठकीला गैरहजर..?
एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, कृपाल तुमाने आणि कलाबेन डेलकर हे खासदार या बैठकीला अनुपस्थित आहेत. तर राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हे दिल्लीत असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. भाजपसोबत युती करण्याची भूमिका शिवसेनेच्या १५ खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मांडली. यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येणाऱ्या काळात राजकीय समीकरण बदलणार का? हेही आता पहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
चुकीला माफी नाही! गद्दार आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी; बांगर म्हणाले…
“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल
…म्हणून राष्ट्रपतिपदाची उमेदवारी नाकारली; शरद पवारांनी केला मोठा खुलासा
“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल