शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने बापाच्या नावाऐवजी लावले उद्धव ठाकरेंचे नाव; म्हणाला, ‘मी उद्धव ठाकरेंनाच…’

निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिले आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर काही राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहे

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी हा निर्णय अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी सुद्धा आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. कन्नड मतदार संघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उदयसिंह राजपूत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका सुद्धा केली आहे. मी ज्यांना निष्ठावंत समजत होतो ते नेते डुप्लिकेट निघाले. आज मी निष्ठावंत म्हणून समोर उभा आहे, असे उदयसिंह राजूपत यांनी म्हटले आहे.

माझं नाव उदयसिंह चित्रसरदार राजपूत आहे. पण माझं राजकारणातील नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आहे. त्यामुळे व्हिप संदर्भात मी उद्धव ठाकरे यांचाच आदेश पाळणार आहे. बंडखोरी आधी मी आमदारांच्या रांगेत सर्वात शेवटी होतो. पण वाटायचं पुढे बसलेले सर्व निष्ठावंत असतील, पण ते डुप्लिकेट होते, असे उदयसिंह यांनी म्हटले आहे.

आज मी निष्ठावंत म्हणून पुढे बसलो आहे. निष्ठावंत हे काही कपाळावर लिहिलेलं नसतं. कारण पहिल्या दिवशी ठाकरेंच्या बाजूला बसलेले आमदार दुसऱ्या दिवशी गुवाहटीला गेले होते. सध्या ठाकरेंची खुप क्रेझ आहे. त्यामुळे जो उठतो तो ठाकरेंना लक्ष्य करत आहे, असे उदयसिंह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शुक्रवारी निवडणूक आयोगाने चिन्हा आणि पक्षाच्या नावाबाबत निकाल दिला आहे. पण हा निकाल उद्धव ठाकरेंना मान्य नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल पक्षपाती असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘कसब्यातून निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा ७ मजली करणार’; भाजपची मोठी घोषणा
उद्धव ठाकरेंची मागणी योग्यच, निवडणूक आयोग बरखास्त करा; भाजपच्या बड्या नेत्याचा पाठींबा
‘अदानी गृपला पाहीजे तेवढे कर्ज आम्ही देऊ’; ‘या’ सरकारी बॅंकेने केली घोषणा