udayanraje bhosle angry on bhagatsingh koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेते यांच्याकडून सतत छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून जनता आणि राजकीय नेते संताप व्यक्त करत आहे. खासदार उदयनराजे सुद्धा त्या नेत्यांवर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे सुधांशू त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा या भाजपशी निवडीत नेत्यांनी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्ये केली आहे. त्यानंतर आता भाजप खासदार उदयनराजे यांनी रायगडावर एक मेळावा घेतला आहे. यावेळी बोलताना ते भाजप नेत्यांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा संदेश का दिला आहे? सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने राहावे,यासाठी त्यांनी लढा दिला आहे. मात्र राजकीय नेत्यांकडून शिवाजी महाराजांविषयी तेढ निर्माण केले जात आहे. नेते सर्व धर्म समभावाचा विचार राजकीय हेतू साधण्यासाठी करत आहे, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात. राज्याचे प्रमुख राज्यपाल असतात. त्या राज्यपालांचं मी नाव घेणार नाही. पण ते शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या विधानावर पांघरुन घालणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? असा सवाल उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पूर्वीच्या काळी देश मुघलांच्या तावडीत होता. आता देश पुन्हा विकृत लोकांच्या हाती गेला आहे, हे सांगतांना खंत वाटते. शिवाजी महाराजांनी विकृतांच्या हातातून देश बाहेर काढला. आता तुम्हीच लोक लोकशाहीचे राजे आहात, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.
लवकरच एक तारीख ठरवून आझाद मैदानात जायचं आहे. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा आहे. कारण आज आपण सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे, असे म्हणत उदयनराजे यांनी भाजपला हा इशाराही दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Taimur : तैमूरला सांभाळणाऱ्या आयाच्या पगारासमोर काहीच नाही तुमचा पगार; आकडा ऐकून चक्कर येईल
Raj Thackeray : आमच्याकडे आहे एक पठ्ठ्या, उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो
Bihar : ऑर्केस्ट्रात गाणी वाजवायचा, कुठेही गेला की लग्न करून यायचा! पकडल्यावर निघाल्या 6 बायका