Share

सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात; २ ठार तर ४६ जखमी, अपघाताची भयानकता वाचून अंगावर काटा येईल

Bus Accident : जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबता थांबेन असे झाले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) रायगड (Raigad) जिल्ह्यातील खोपोली शहराजवळील डोंगराळ भागात रविवारी रात्री बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा (student) जागीच मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे, मुंबईतील चेंबूर भागातील एका कोचिंग संस्थेत शिकणारे विद्यार्थी सहलीसाठी  (Student Trip) गेले होते. त्यावेळी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जाते आहे. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर या बसचा अपघात झाला. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस मुंबईतील चेंबूरहून मावळकडे निघाली होती. ही बस मावळात असलेल्या थीम पार्कमध्ये गेली होती. या बसमध्ये सर्वजण 10वीचे विद्यार्थी असुन त्यामध्ये खाजगी क्लासच्या दोन शिक्षकांचा देखील समावेश आहे.

मावळहून परतत असताना बसचा अपघात झाला. हे विद्यार्थी एका खासगी कोचिंग सेंटरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. लोणावळा हिल स्टेशनपासून सुमारे 14 किमी अंतरावर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मॅजिक पॉइंट हिलजवळ रात्री 8 वाजता ही घटना घडली. यावेळी तात्काळ पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले.

या अपघातात हितीका खन्ना नावाची एक 17 वर्षांची विद्यार्थीनी तर राजेश म्हात्रे नावाच्या 16 वर्षीय विद्यार्थांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर जखमी विद्यार्थ्यांचे पालकही प्रचंड धास्तावले आहे. या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जातेय.

महत्वाच्या बातम्या –

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now