Share

एकमेकींच्या प्रेमात वेड्या झाल्या तरुणी, पोलिस ठाण्यात पोहचून घातला हायव्होल्टेज ड्रामा

प्रेम प्रकरणाची अनेक प्रकरणे समोर येत असतात. आता अशीही अनेक प्रेम प्रकरणे समोर येत आहे, ज्यामध्ये मुलगा-मुलगी नाही तर मुलगीच मुलीच्या प्रेमात पडत आहे. असेच एक प्रकरण आता बिहारमधून समोर आले आहे. बिहारच्या पाटणातून ही घटना समोर आली आहे. (two girl reach police station in patana)

दिल्लीहून पाटण्याला आलेल्या दोन मुलींनी लग्नासाठी हट्ट केल्याने गुरुवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. त्या मुली म्हणाल्या की, त्या एकमेकींना आवडतात, पण कुटुंबीय त्यांच्या नात्यावर नाराज आहेत. त्यांना लग्न करायचे आहे.

दोन्हीही प्रौढ आहेत. पोलीस ठाण्याने दोन्ही मुलींची समजूत घालून त्यांना घरी पाठवले. त्या दोघेही एकमेकींची साथ कधीच सोडणार नाही असे त्या सांगत आहे. एसएचओ कुमारी किशोरी सहचारी यांनी सांगितले की, हे प्रकरण त्यांच्या अखत्यारीत नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही.

तसेच यावर बोलताना एका तरुणीचे म्हणणे आहे की, तिच्या मैत्रिणीचे नातेवाईक तिच्यावर अपहरणाचा आरोप करत आहेत. दुसऱ्या मुलीने सांगितले की, दोघेही स्वतःच्या इच्छेने एकत्र राहत आहोत. आम्हाला वाचवा जर आम्ही घरी परतलो तर आम्हा दोघींनाही नातेवाईक ठार मारतील.

दोन्ही मुली पाटणाच्या रहिवासी आहेत. त्या बराच काळापासून दिल्लीत राहात होत्या. पोलीस ठाण्यात मुलींनी सांगितले की, ते एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखत आहेत. त्यांनी जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल नातेवाईकांना सांगितले तर त्यांनी विरोध केला. ते म्हणाले, हे नाते अशक्य आहे.

दरम्यान, त्यातल्या एका मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणप्रकरणी एफआयआर दाखल केल्याचे सांगितले जात आहे. दोघांच्या नात्याला घरच्यांनी विरोध केला. पण आम्ही एकमेकींना आवडत असून आम्हा दोघींना सोबत राहायचे आहे, असे त्या तरुणी म्हणत आहे,

महत्वाच्या बातम्या-
मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार! दोन नगरसेवकांसह ‘हा’ मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
होय आमच्यात मतभेद आहेत, पण…; वसंत मोरेंनी पहिल्यांदाच दिली कबुली; पुढचा मार्गही सांगितला
UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना लाच घेताना रंगेहात पकडले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now