सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे. अभिनेत्री केतकी चितळे हीच प्रकरण सध्या चांगलच गाजत आहे. ठाणे पोलिसांनी कारवाई करत केतकीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला १८ तारखेपर्यं पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अखेर आज कोर्टात हजर केल्यानंतर केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर दुसरीकडे पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
यावेळी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करुन शिवीगाळ करणं, धमकावणं, अश्लील हातवारे करणे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवराज तिकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच प्रकरणांवरून भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाईंनी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे एक मागणी केली आहे. ‘पवारांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीकडे फक्त एक महिना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं,’ अशी विनंती तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
याबाबत बोलताना पुढे त्या म्हणतात, ‘कायदा काय असतो, महिला आयोगाला काय अधिकार आहेत आणि कायद्यानुसार कसे धाबेदणाणतात हे मी दाखवून देईन. महिला सक्षमीकरण कसं झालं पाहिजे आणि समान वागणूक कशी दिली जाते, हे मी दाखवून देऊ शकते, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
तसेच ‘रूपाली ताई सपशेल अपयशी ठरल्यात, राज्य महिला आयोगाचे नाव बदलून “राष्ट्रवादी महिला आयोग” केले पाहिजे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत,’ असही तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत.
दरम्यान, ‘पक्षातल्या कुणावर काही गुन्हा दाखल झाला की कारवाई करायची. मात्र विरोधी पक्षातलं काही असेल तर फारसं लक्ष द्यायचं नाही असं काम होत नसतं,’ असही यावेळी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या. सध्या राज्यात सुरू असलेल्या प्रकणांवरून तृप्ती देसाई यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पेप्सीच्या ‘त्या’ एका चुकीमुळे देशात झाल्या होत्या दंगली, पेप्सीचे झाले होते करोडोंचे नुकसान
राज ठाकरेंची पुण्यातील सभा अचानक रद्द, तातडीने मुंबईला रवाना
४५० मातीच्या भांड्यांचा वापर करून तयार केले छत, उन्हाळ्यातही एसीची गरज भासत नाही
डोळ्यांवर चष्मा, पांढरी दाढी, ५७ व्या वर्षी टी-२० मध्ये पदार्पण; सचिनच्या आधीपासून खेळतोय वन-डे