प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तिने फेसबूकवर पोस्ट करत शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (trupti desai on ketki chitale)
केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे. असे असतानाच या प्रकरणावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी एक हैराण करणारी प्रतिक्रिया दिली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी केतकीच्या पोस्टवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही. केवळ पवार उल्लेख आल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. तसेच केतकी विरुद्ध घाणेरड्या कमेंट करुन आपण संस्कारहीन असल्याचे दाखवू नका, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
आपल्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.केतकीच्या पोस्टमध्ये कुठेही शरद पवारांचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे तिच्या पोस्टमधील पवार हे नक्की शरद पवारच आहेत का? कारण पुर्ण नाव दिसत नाहीये. पण पवारसाहेबांबद्दल ते जाणूनबुजून लिहिलं असेल, तर ते नक्कीच चुकीचं आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
केतकीच्या पोस्टवर आक्षेपार्ह असणाऱ्यांनी तिच्यावर कायदेशीर तक्रार करावी. मात्र तिच्यावर घाणरडे ट्रोलिंग करुन आपले संस्कार दाखवू नये, अशा शब्दांमध्ये तृप्ती देसाई यांनी केतकीवर टीका करणाऱ्यांना सुनावले आहे. केतकीच्या पोस्टनंतर अनेकांनी तिच्यावर आक्षेपार्ह कमेंट होत्या.
दरम्यान, याप्रकरणी केतकीविरोधात ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला अटकही करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केतकीविरुद्ध आक्रमक झाले आहे. तर अनेकांनी तिच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
गाढवांनी आम्हाला लाथ मारण्याआधीच आम्ही त्यांना लाथ मारली; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
नशेत गर्लफ्रेंडसोबत असा काही प्रकार घडला, ज्याचा त्याला थांगपत्ताच लागला नाही अन् जेव्हा कळलं तेव्हा..
मुख्यमंत्र्यांनी खास शैलीत विरोधकांना घेरले; वाचा ‘मास्टर’ सभेत उद्धव ठाकरेंनी मारलेले प्रमुख टोमणे