Share

गुरु पौर्णिमेच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, पहा काय आहे तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

जागतिक परिस्थितीमुळे सोन्या-चांदीच्या दरात गेल्या आठवड्यापासून अनेक वेळा चढ-उतार येत आहे. अशा स्थितीत सराफ बाजारात सोने-चांदीची खरेदी जोरात सुरू आहे. तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. (today gold and silver price)

सोन्याच्या भावात आता पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र तेजी पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज २२ कॅरेटसाठीच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,८०० रुपये आहे, तर २४ कॅरेटची ५१,०५४ रुपये आहे.

अशात चांदीच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. आज १० ग्रॅम चांदीचा दर ६२५ रुपये आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात २४ कॅरेट सोन्याचे वेगवेगळे भाव आहे. तुम्हाला जर आज सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्ही सुद्धा तुमच्या शहरातील भाव जाणून घेऊ शकतात.

देशातील महत्वाच्या शहरांमधील २४ कॅरेटसाठीच्या १० ग्रॅम सोन्याचे दर
मुंबई- ५१,०५४ रुपये
पुणे- ५१,१५० रुपये
नागपूर- ५१,१५० रुपये
लखनऊ- ५१,२०० रुपये
कोलकाता- ५१,०५४ रुपये
हैदराबाद- ५१,०५४ रुपये
दिल्ली- ५१,०५४ रुपये
चेन्नई- ५०,९५० रुपये

सोन्याची शुद्धा तपासण्यासाठी त्याच्यावर आयएसओ म्हणजेच इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशनद्वारे हॉल मार्क दिले जातात. त्यानुसार २४ कॅरेटवर सोन्यावर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहिलेलं असतं. २२ कॅरेट सोने लोक जास्त विकत घेतात, तर काही लोक १८ कॅरेट सोनेही वापरतात.

२४ कॅरेट सोने हे ९९.९ टक्के शुद्ध असते. तर २२ कॅरेट सोने हे अंदाजे ९१ टक्के शुद्ध असते. जे सोने २२ कॅरेटचे असते, त्यामध्ये तांबे, चांदी, जस्त यांसारखे धातू हे ९ टक्के असतात, त्यांच्या मिश्रणाने दागिने तयार केले जातात. तर २४ कॅरेट सोने हे शुद्ध असले तरी त्याचे दागिने तयार केले जाऊ शकत नाही.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यमुळे काँग्रेस नाराज; थोरात म्हणाले, पाठिंबा देण्याआधी…
‘ग्रीन टी मधून गुंगीचे औषध देऊन…’, श्रीकांत देशमुखांचा मोठा खुलासा
मातोश्रीबाहेर मृत्यू झालेल्या शिवसैनिकासाठी एकनाथ शिंदे आले धावून, केली मोठी मदत

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now