Share

Sword of Tipu Sultan : टिपू सुलतानाची पराक्रमी तलवार पुन्हा येणार भारतात; ब्रिटनने घेतला मोठा निर्णय

tipu sultans sword

Sword of Tipu Sultan: ब्रिटनने भारतातून चोरून नेलेली ७ महत्त्वपूर्ण शिल्पं, अनेक कलाकृती आता ब्रिटन भारताला परत करणार असल्याचे त्या देशाने मान्य केले आहे. त्यामुळे आता हा ऐतिहासिक खजिना भारताला परत मिळणार आहे. त्याबाबत सर्व इतिहासप्रेमी व सामान्य नागरिकांमध्ये आनंदाची भावना आहे.

भारतीय उच्चआयुक्तांच्या गटाने केलव्हिंग्रोव्ह आर्ट गॅलरी आणि संग्रहालयासोबत करार केला. त्यानंतर या कलाकृती आणि शिल्पं भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतातून अनेक कलाकृती, शिल्पं ब्रिटनमध्ये चोरून नेण्यात आली होती. तोच ऐतिहासिक खजिना, त्या कलाकृती आता भारतात पुन्हा आणता येण्याची आशा असल्याचे सांगण्यात येते.

या दुर्मिळ कलाकृती कोलकाता, ग्वाल्हेर, हैदराबाद, बिहार, कानपूर या भागांमधल्या असल्याचे सांगण्यात आले. परत आणण्यात येणाऱ्या कलाकृतींमध्ये काही शिल्पं १ हजार वर्षे जुनी आहेत. तसेच टिपू सुलतानची तलवार आणि म्यान पण यात परत मिळणार आहे.

या दुर्मिळ वस्तूंमध्ये अकराव्या शतकातील दगडी फलक, चौदाव्या शतकातील दगडी कलाकृती, एकोणिसाव्या शतकामधल्या मंदिर, देवस्थानातून चोरलेली शिल्पं यांचा समावेश आहे. १९०५ मध्ये हैदराबादच्या निजामाच्या संग्रहालयातून खुद्द इंग्लंडच्या पंतप्रधानांनी या वस्तू नेल्या होत्या.

नंतर त्या वस्तू ब्रिटिश जनरल हंटर यांना विकण्यात आल्या. पुढे ग्लासगो संग्रहालयाला त्या भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. त्या सर्व कलाकृती आणि शिल्पं आता भारतात परत पाठवण्यात येणार आहेत, असे ग्लासगो संग्रहालयाच्या प्रमुखांनी सांगितल्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
Aamir Khan: चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिरला धक्क्यावर धक्के, आता Netflix सोबतची ‘ही’ डीलही झाली कॅन्सल
Cricketer: एकेकाळी होता स्टार क्रिकेटपटू, आता रिक्षा चालवून भरतोय पोट, कहाणी वाचून डोळे पाणावतील
Eknath Khadse : २०१४ ला युती तोडण्याचा निर्णय माझा नव्हे तर..; एकनाथ खडसेंनी भाजपचे आतले सत्य काढले बाहेर

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय इतर

Join WhatsApp

Join Now