Share

ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने ११ लाख लोकांना पदे गमावली, हिच ११ लाखांची ताकद रस्त्यावर उतरली तर..

देशभरातील ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी नेत्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया असं त्यांनी म्हटलं आहे. आव्हाडांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड वारंवार ओबीसी विषयक ट्विट करत आहेत.

दरम्यान, नुकतंच आव्हाडांनी ओबीसींबाबत एक विधान केलं होतं, त्याला उत्तर देताना भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे सदस्य आणि मुंबई भाजपचे सचिव प्रतीक कर्पे यांनी जोरदार टीका केली होती. कर्पे म्हणाले होते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना सत्तेची उब मिळाल्याने ते आता ओबीसी बांधवांना विसरले आहेत. त्याचमुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही, ओबीसींना लढायचेच नसते अशी अपमानकारक विधाने ते करीत आहेत.

देशभारत ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. यामुळं ११ लाख लोक प्रतिनिधीनी आपली पदं गमावली. राजकीय आरक्षण गेल्यामुळं ओबीसी मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाईल. हीच ११ लाखांची ताकद रस्त्यावर उतरली असती तर नवीन इतिहास लिहिला गेला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया…” असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1478731616843272196

सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात आव्हाड यांनी नुकतीच ओबीसी समाजावर टीका केली होती. ओबीसींच्या आरक्षणासाठी मंडल आयोग आला, पण त्यासाठी लढायची वेळ आली तेव्हा लढाईसाठी ओबीसी मैदानात नव्हते. तर लढायला होते ते महार आणि दलित, ओबीसींना लढायचेच नसते. असे म्हणत त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले होते.

ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय की आपण श्रेष्ठ आहोत, असे त्यांना वाटते. पण चार-पाच पिढ्यांपूर्वी आपल्या बापांना-आज्यांना मंदिरप्रवेश नव्हता हे ते विसरलेत, असे विधान आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडियो देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यासंदर्भात कर्पे यांनी वरीलप्रमाणे टीका केली होती.

जितेंद्र आव्हाड यांच्या अशा विधानानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह सुधीर मुनगंटीवर यांनी देखील आव्हाडांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. मात्र आता पुन्हा आव्हाडांनी ओबीसींबाबत ट्विट करत नव्या वादाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विरोधातील ओबीसी नेते याला काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ताज्या बातम्या
 माझी फ्लाईट चुकली आहे, प्लीज.., दिल्ली विमानतळावर एकाने १०० प्रवाशांना लुटले, वाचून अवाक व्हाल
बातमी फायद्याची! टाटाची ‘ही’ इलेक्ट्रीक कार घेण्यासाठी सरकार देतय अडीच लाख रूपये अनुदान
ज्याच्यामुळे बिकट परिस्थिती ओढवली ‘त्या’ नवऱ्यालाही लेकरासारखं सांभाळणाऱ्या सिंधुताई; वाचा ह्रदय हेलावनारा किस्सा..
‘बॉयकॉट चायना’चा नारा देऊनही चीनच्या वस्तू भारतात का विकल्या जातात? काय आहे यामागचे कारण?

राजकारण

Join WhatsApp

Join Now