Homeक्राईममाझी फ्लाईट चुकली आहे, प्लीज.., दिल्ली विमानतळावर एकाने १०० प्रवाशांना लुटले, वाचून...

माझी फ्लाईट चुकली आहे, प्लीज.., दिल्ली विमानतळावर एकाने १०० प्रवाशांना लुटले, वाचून अवाक व्हाल

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI विमानतळ) आंध्र प्रदेशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे भासवून विमान मिस झाल्याच्या बहाण्याने प्रवास करण्यासाठी लोकांकडून पैसे उकळणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. व्ही दिनेश कुमार असे त्याचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी आहे, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने गेल्या चार ते पाच वर्षांत आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांची फसवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या पीजी मेन्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने १९ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली की तो बडोद्याहून दिल्ली विमानतळाच्या टी-३ टर्मिनलवर पोहोचला. येथे आरोपीने त्याच्याजवळ जाऊन आपण आंध्र प्रदेशातील एका नामांकित विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे सांगितले.

फिर्यादीनुसार, आरोपीने त्याला विद्यापीठाचे ओळखपत्र दाखवले आणि तो चंदीगडहून आला असून विशाखापट्टणमला जाणारे त्याचे विमान चुकल्याचे सांगितले. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने त्याला विशाखापट्टणमच्या सुटलेल्या फ्लाइटचे १५ हजार रुपयांचे तिकीट दाखवले आणि आपल्याकडे फक्त ६ हजार रुपये असल्याचे सांगितले.

तक्रारकर्त्याचा आरोप आहे की आरोपीने पीडिताला तिकीटाची देय रक्कम देण्यास प्रवृत्त केले आणि त्याच्या गंतव्यस्थानी गेल्यावर त्याला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पीडिताने गुगल पेद्वारे त्याच्या खात्यावर ९२५० रुपये पाठवले. वारंवार विनंती करूनही आरोपीने पैसे परत न केल्याने फिर्यादीने पोलिसात जाऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

संजय त्यागी, पोलिस उपायुक्त (विमानतळ) म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, संशयिताला ३० डिसेंबर रोजी टर्मिनल-२ वरून पकडण्यात आले, जेव्हा तो दुसऱ्या प्रवाशाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होता.” असेही समोर आले आहे की आरोपीविरुद्ध आधीच ५ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्याच्याविरोधात ट्विटरवरही अनेक तक्रारी आहेत.