Share

सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर डेव्हिडने दाखवून दिली रोहित शर्माची चूक; म्हणाला…

इंडियन प्रीमियर लीगच्या ५१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज टिम डेव्हिडने जोरदार फलंदाजी केली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेत टिम डेव्हिडने २१ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली. सामनावीर डेव्हिडने आपल्या झंझावाती खेळीत चार षटकार आणि दोन चौकार लगावले. (tim david shocking statement on mumbai indians)

आयपीएलच्या चालू हंगामातील टिम डेव्हिडचा हा केवळ चौथा सामना होता. दोन सामने खेळल्यानंतर डेव्हिडला मुंबई संघाने वगळले होते, पण आता डेव्हिडने दाखवून दिले की त्याला बाहेर ठेवणे ही मोठी चूक होती. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या संघाच्या अखेरच्या सामन्यात डेव्हिडने प्लेइंग-११ मध्ये पुनरागमन केले होते. राजस्थानविरुद्धच्या त्या सामन्यात डेव्हिडने ९ चेंडूत नाबाद २० धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

गुजरातविरुद्ध धडाकेबाज पारी खेळल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. यावेळी बोलताना तो म्हणाला की, जिंकल्यानंतर खूप छान वाटतंय. तुमच्या संघाला योग्य रिझल्ट मिळत नसताना मैदानाच्या बाहेर बसणं खुप कठिण असतं. त्यामुळे डेव्हिडला संघात संधी न देण्याच्या रोहितच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. काहींनी तर डेव्हिडला संघात संधी न देणे ही रोहितची सर्वात मोठी चुक होती, असेही म्हटले आहे.

डेव्हिड हा ऑस्ट्रेलियन वंशाचा खेळाडू असून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिंगापूरचे प्रतिनिधित्व करतो. डेव्हिडने १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५८ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ५५८ धावा केल्या आहेत. आयपीएलशिवाय दाऊदने बीबीएल आणि पाकिस्तान सुपर लीगमध्येही भाग घेतला आहे.

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात टिम डेव्हिडला मुंबई इंडियन्सने ८.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. टीम डेव्हिड गेल्या सिजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता. आयपीएलमध्ये सहभागी होणारा डेव्हिड हा पहिला सिंगापूरचा क्रिकेटर आहे.

दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १७७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने २८ चेंडूत ४३ धावा केल्या, तर इशान किशननेही २९ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४५ धावांचे योगदान दिले. गुजरात टायटन्सकडून राशिद खानला सर्वाधिक दोन यश मिळाले. तसेच प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचा संघ २० षटकांत ५ गडी गमावून १७२ धावाच करू शकला.

महत्वाच्या बातम्या-
उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील ‘तो’ व्हिडीओ झाला लीक, हॉट अवतार पाहून तुम्हालाही फुटेल घाम
पतीला सोडून प्रियकरासोबत विदेशात पळाली होती ‘ही’ अभिनेत्री, नंतर रस्त्यावर भिकाऱ्यासारखे घालवले जीवन
नशिब MRI मशीनच्या आत जाऊन फोटो नाही काढला…; MRI चे फोटो व्हायरल केल्याने राणा ट्रोल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now