Share

रोहीत शर्माच्या जवळच्या खेळाडूला संघात नो एन्ट्री; हरभजन आणि गावसकरनेही केले होते कौतूक

आयपीएल २०२२ मध्ये अंडर १९ मधील स्टार खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडूने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात एका खेळाडूने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आगामी काळात हा खेळाडू टीम इंडियाचा स्टार मानला जात आहे.

दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या टी २० मालिकेसाठी या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही. दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या टी २० च्या मालिकेसाठी २२ मे ला १८ सदस्यांचा संघ बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. १९ वर्षीय फलंदाज तिलक वर्माचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला नाही.

मुंबई इंडियन्ससाठी तिलक वर्माने आयपीएल २०२२ मध्ये महत्वपूर्ण खेळी केल्या आहेत. तिलक वर्माला मात्र निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात आला नाही. आयपीएलमध्ये एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माने सांगितले आहे की, तिलक वर्मा टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू शकतो.

सुनिल गावस्कर यांनी रोहितच्या विधानावर प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळालं आहे. तिलक वर्माला थोडे कष्ट करणे आणि फिटनेस सुधारणे आणि रोहितला योग्य सिध्द करणे हे त्याच्यावर आहे, असे सुनिल गावस्कर यांनी तिलक वर्माबाबत सांगितले आहे.

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिलक वर्मा दुसरा खेळाडू आहे. आयपीएलच्या १२ सामन्यांमध्ये तिलक वर्माने ४०.८९ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या आहेत. तिलक वर्माने आयपीएलमध्ये २ अर्धशतके केली आहेत.

माजी खेळाडू हरभजन सिंगने तिलक वर्माबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महान फिरकीपट्टू हरभजन सिंग एका इव्हेंटमध्ये म्हणाला होता की, डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्माने या हंगामात त्यांच्या टॅलेंटची झलक सर्वाना दाखवली आहे. डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा हे दोघे पुढील दहा वर्ष मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसतील.

महत्वाच्या बातम्या
मुख्याध्यापक पतीचा पत्नीकडून अमानूष छळ, दररोज बॅटने जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल
सोनालीचा संस्कारी बहु’वाला अंदाज! सासरी बनवली खीर, उखाणाही घेतला, मंगळसुत्राच्या उलट्या वाट्या…
अनुष्काचा ब्लॅक आऊटफिट हॉट लूक पाहून विराटचाही संयम तुटला; फोटोवर कमेंट करत म्हणाला…
दिलदार सलमान! ‘भाभी जी घर पर है’ चे विभूती झाले होते कंगाल, सलमानने अशी केली होती मदत

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now