असे म्हणतात की जोड्या स्वर्गात बनवल्या जातात. कोण कोणाचा लाईफ पार्टनर बनणार हे सांगता येत नाही. पण सध्या एक तरुण चांगलाच चर्चेत आला आहे, तो चर्चेत येण्याचे कारणही खुप हैराण करणारे आहे. कारण त्याने एकाच दिवशी तीन सख्ख्या बहिणींशी लग्न केले आहे. (three sisters marry one guy)
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे लुविजो सध्या चर्चेत आहेत. लुविजोने तीन बहिणींशी एकत्र लग्न केले आहे. तिन्ही तरुणी जुळ्या बहिणी आहेत आणि त्यांनी एकाच दिवशी लुविजोशी लग्न केले. लुविजोने सांगितले की, तिन्ही तरुणींनी मला एकाचवेळी प्रपोज केला होता. याचा तिला आनंद आहे.
३२ वर्षीय लुविजोने सांगितले की, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नौटीलीला पहिल्यांदा भेटला होता आणि तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. पण जेव्हा त्याने नताशा आणि नाडेजे या इतर दोन बहिणींना नौटीलीच्या रूपात पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला पण त्याला इतर दोघींचेही सौंदर्य आवडले. दरम्यान, नौटेलीप्रमाणेच इतर दोन बहिणीही लुविजोच्या प्रेमात पडल्या. त्यामुळे तिघांनी मिळून लुविजोला प्रपोज केले. या चौघांनी २८ फेब्रुवारीला साउथ किवु येथील कालेहे येथे लग्न केले.
बहिणींनी सांगितले की, त्या लहानपणापासून एकमेकांसोबत गोष्टी शेअर करायच्या, त्यामुळे त्यांनीही नवऱ्याला शेअर करण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो की ३ महिला एका नवऱ्याला कशा प्रकारे शेअर करत आहेत यावर विश्वास ठेवणे लोकांना कठीण जात आहे, परंतु तिघीही खूप आनंदी आहेत.
एका बहिणीने सांगितले की, तिला वाटले की देव त्यांना वेगवेगळे पती देऊन एकमेकांपासून वेगळे करेल, पण तसे झाले नाही. जेव्हा लुविजोला पहिल्यांदा समजले की त्याला तिन्ही बहिणींचे एकत्र लग्न करायचे आहे, तेव्हा तो काहीसा आश्चर्यचकित झाला, परंतु एका बहिणीच्या प्रेमामुळे तो इतर दोघींवरही प्रेम करू लागला आणि त्याने लग्न केले.
खरंतर तरुणाने जर तिघींसोबत लग्नाला होकार दिला नसता तर त्याच्यासोबत एकीनेही लग्न केले नसते. त्या तिन्ही तरुणींनी या तरुणासमोर ही अटच ठेवली होती, की लग्न करावे लागेल तर तिघींशी नाहीतर नाही. लोकांना जरी तीन तरुणींचा एकच नवरा असणं अशक्य वाटत असलं तरी आम्ही लहानपणापासून सर्व गोष्टी शेअर करत आलो आहोत आणि आता पतीलाही शेअर करणार आहोत, असे एका बहिणीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
युट्युबवर बघून अफूची शेती करणे शेतकऱ्याला पडले महागात; शेतात पोलिसांनी टाकली धाड
आंधळं प्रेम! तरुणीने भावासोबतच लग्न करण्याचा धरला हट्ट, नंतर व्हिडीओ बनवला आणि..
वडील गेल्यामुळे ढसाढसा रडला शेन वॉर्नचा मुलगा; म्हणाला, माझं आयुष्य खुप निराशाजनक…