केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील कन्हानगड येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे तीन लोकांनी एका चार महिन्यांची गर्भवती असलेल्या बकरीवर बलात्कार केला. यानंतर तिघांनीही बकरीचा जीव घेतला आहे. ही बकरी कोट्टाचेरी येथील एलिट हॉटेल मालकाची होती, असे होसादुर्गा पोलिसांनी सांगितले. (three man rape goat)
एका महिन्यानंतर बकरीची प्रसूती होणार होती. या गुन्ह्याप्रकरणी होसादुर्गा पोलिसांनी हॉटेल कर्मचारी सेंथिल याला अटक केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून सेंथिलसोबत असलेल्या अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास हॉटेलच्या मागच्या अंगणातून बकरीचा ओरडण्याचा आवाज येत होता. जेव्हा हॉटेल मालक आवाज ऐकूण बाहेर आला तेव्हा त्यांना तीन लोक भिंतीवरून धावताना दिसले. त्यावेळी बकरी मृत अवस्थेत पडलेली होती. त्यांनी पळून जात असलेल्या सेंथिलला पकडले. तर बाकीचे दोघे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर हॉटेल मालकाने त्याला पोलिस ठाण्यात नेले.
हॉटेल मालकाने सांगितले की, तामिळनाडूचा रहिवासी असलेला सेंथिल साडेतीन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात आला होता. प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांनुसार आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३७७ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याला जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ अंतर्गत प्राण्यांशी संबंध ठेवण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ४२९ नुसार कोणत्याही प्राण्याला मारणे, विष देणे, अपंग करणे यासाठी साध्या किंवा सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कलमानुसार, एकतर कारावासाची शिक्षा होईल जी पाच वर्षांपर्यंत वाढू शकते किंवा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात सर्वात आधी निवडला जाणार, गावसकरांनी केली भविष्यवाणी
रवी शास्त्रींनी भारतासाठी शोधला नवीन वेगवान गोलंदाज, म्हणाले, ‘हा फलंदाजांसाठी ठरेल डोकेदुखी’
भारताचे चीनसोबत युद्ध झाले तर रशिया कोणाची साथ देणार? बाकीच्या देशांची काय भूमिका असेल?