Suryakumar Yadav : काल साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादववर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. सूर्यकुमार यादवला या सामन्यानंतर तब्बल तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. झुंजार खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने नवी विक्रम या सामन्यानंतर रचले. त्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात घेतली जात आहे.
सूर्यकुमार यादवने धमाकेदार खेळी करत अर्धशतक झळकावले. आणि भारताने साऊथ आफ्रिकेवर कालच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्याचसोबत सूर्यकुमार भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. सूर्यकुमार यादव आतापर्यंत एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. २०१८ साली शिखर धवनने ६७९ धावा केल्या होत्या. काल झालेल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने अर्थशतक केल्यानंतर त्याच्या ७३२ धावा पूर्ण झाल्या.
दुसरी आनंदाची बातमी म्हणजे, सूर्यकुमार यादवने अजून एक विक्रम केला. या सामन्यापूर्वी सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये मोहम्मद रिझवान वरच्या स्थानी होता. पाकिस्तानच्या या खेळाडूने तब्बल ४२ सिक्स मारले. आता काल झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने ३ सिक्स मारले आणि त्यानंतर सूर्यकुमारने ४५ सिक्स मारण्याचा आकडा पूर्ण केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचे रेकॉर्ड सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे.
तिसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आयसीसी टी ट्वेंटीच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या मालिकेदरम्यान शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३६ बॉलमध्ये ६९ रन करून रन रेटिंगमध्ये ८०९ गुण मिळवले. याबाबतीत त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले.
सूर्यकुमार यादवने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे टी ट्वेंटी वर्ल्डकपसाठी भारतीय संघात तो महत्त्वपूर्ण खेळाडू ठरणार असल्याचे दिसते. सूर्यकुमार यादव कोणत्याही दिशेने शॉट खेळू शकतो. त्याच्या या कौशल्यामुळे सूर्यकुमारला भारताचा मिस्टर ३६० म्हणले जाते.
महत्वाच्या बातम्या-
shivsena : आनंद दिघेंना साक्षात्कार झाला अन् टेंभी नाक्यावर झाली दुर्गेश्वरी देवीची स्थापना, वाचा राजकीय इतिहास
shivsena : एकनाथ शिंदे १५ आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते पण.., चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
PHOTO: ‘या’ पुस्तकांच्या ढिगाऱ्यामध्ये शोधून दाखवा पेन्सिल, फक्त १% जीनिअसच देऊ शकतात योग्य उत्तर