Share

रोहितनंतर अय्यर-पंत नाही तर ‘हे’ दोन खेळाडू बनू शकतात टीम इंडियाचे कर्णधार, नावं वाचून अवाक व्हाल

रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर रोहितकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली होती, पण आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकता आला आहे. (this to playe chances to futube captain of india)

रोहित शर्मा आता ३५ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यानंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असेल, अशी चर्चा सुरू आहे. आयपीएलपूर्वी टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी तीन मोठे दावेदार होते. आयपीएल २०२२ मध्ये, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने ९ पैकी ४ सामने जिंकले आहेत.

पंतने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अतिशय विचित्र वागताना दिसला. २० व्या षटकात पंचांनी नो बॉल न दिल्याने ऋषभ पंतने आपल्या खेळाडूंना परत बोलावण्यास सुरुवात केली. कोणत्याही संघाचा कर्णधार असताना हे वर्तन अतिशय वाईट होते, ज्यावर अनेक दिग्गज खेळाडूंनी टीका केली होती. त्याचवेळी पंत फलंदाजीतही फ्लॉप ठरला. त्याने ९ सामन्यांत केवळ २३४ धावा केल्या आहे.

रोहित शर्मानंतर श्रेयस अय्यर हा टीम इंडियाचा कर्णधार बनण्याचा सर्वात मोठा दावेदार होता, पण आयपीएल २०२२ मध्ये, सगळ्याच गोष्टी बदलल्या. आयपीएल २०२२ मध्ये, अय्यरच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाइट रायडर्सने १० पैकी फक्त ४ सामने जिंकले आहेत. श्रेयस अय्यरने या स्पर्धेतील १० सामन्यांत केवळ ३२४ धावा केल्या आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने २०१८ पासून जवळपास प्रत्येक हंगामात सुमारे 600 च्यावर धावा केल्या आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कर्णधारपदाचा त्याच्या कामगिरीवर परिणाम होत नाही. तो दबावाशिवाय निर्णय घेतो. त्यामुळे त्याला संघाचा पुढचा कर्णधार बनवण्यात येईल असे म्हटले जात आहे.

आयपीएल २०२२ मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने १० पैकी ७ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर केएल राहुलही बॅटनेही थिरकत आहे. त्याने १० सामन्यात दोन शतकांच्या मदतीने ४५१ धावा केल्या आहेत. ५६ च्या सरासरीने धावा करणाऱ्या राहुलचा स्ट्राईक रेट १४५ आहे. रोहित शर्मानंतर कर्णधार बनण्याचा तो सर्वात मोठा दावेदार आहे, त्यामुळे त्याला कर्णधारपद मिळू शकते असे म्हटले जात आहे.

अशात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याही या यादीत आहे. त्याच्या नेतृत्वात गुजरातचा संघ दमदार प्रदर्शन करत आहे. आतापर्यंत १० पैकी ८ सामने गुजरातने जिंकले आहे. त्यामुळे त्याचे संघाचे नेतृत्व चांगले असेल, तर त्यालाही भारतीय संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-
भोंगे हटवण्यासाठी मनसेनं उचललं ‘हे’ डिजिटल पाऊल, ठाकरे सरकारची करणार कोंडी
VIDEO: मुलीला छेडणं कपील शर्माला पडलं महागात, कपिलच्या दिली कानाखाली, वाचा संपूर्ण प्रकरण
हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसले मिथुन, मुलाने दिली महत्वाची हेल्थ अपडेट, म्हणाला…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now