एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला आहे. रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर तसेच राहूल द्रविद प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियात मोठे बदल होत आहे. आता पुढील महिन्यापासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास सुरुवात करणार आहे, तेव्हा संघात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळू शकतात. (this player not selected for shrilanka tour)
इशांत शर्मा रणजी ट्रॉफीमधून माघार घेण्याच्या तयारीत असताना, ऋद्धिमान साहाने आधीच आपले नाव मागे घेतले आहे. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे, जे बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये खेळत आहेत. त्यामुळे बीसीसीआय या चारही खेळाडूंचा पत्ता कट करण्याचा तयारीत आहे.
तसेच ते खेळणार की नाही याचे उत्तर काही प्रमाणात श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत मिळणार आहे. रणजी ट्रॉफीसाठी दिल्लीची निवड समिती इशांत शर्माच्या संपर्कात नसल्यामुळे आगामी श्रीलंका मालिकेत तो भारतीय संघाचा भाग नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या पुजारा आणि रहाणेलाही मोठी खेळी खेळावी लागणार असल्याचं समजतंय कारण दोघेही बऱ्याच दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये खेळू शकलेले नाही. दिल्लीचा ३३ वर्षीय इशांत शर्मा सध्याच्या भारतीय कसोटी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे.
इशांत शर्माने १०५ कसोटी सामन्यांमध्ये ३११ विकेट घेतल्या आहेत, मात्र इंग्लंड दौऱ्यापासून तो खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. बुधवारी, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) निवड समितीने रणजी संघ निवडण्यासाठी बैठक घेतली आहे. निवड समिती तसेच पदाधिकाऱ्यांनी इशांतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण तो उपलब्ध नव्हता.
डीडीसीएच्या अनुभवी निवडकर्त्याने सांगितले की, जर त्याला खेळायचे असेल तर त्याला संघात समाविष्ट केले जाईल. कारण तो दिग्गज खेळाडू आहे परंतु त्याचे काय सुरु आहे, याबद्दल आम्हाला माहित नाही. गेल्या आठवडाभरापासून त्याच्याशी संपर्क होत नाही. रणजी संघाच्या सराव सत्रासाठी तो आलेला नाही. त्यांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहीत नाही
याबाबत बीसीसीआयच्या सुत्रांना विचारले असता त्यांनी सांगितले की, साहाप्रमाणेच इशांतलाही आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येईल असे वाटत होते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे अव्वल गोलंदाजांमध्ये अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर शार्दुल ठाकूर हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि उमेश यादव पाचव्या पसंतीचा गोलंदाज आहे.
श्रीलंकेविरुद्ध भारत मोहाली आणि बेंगळुरू येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. यामध्ये संघात दोन वेगवान गोलंदाज शमी आणि बुमराह आणि तिसरा सिराज असेल. अशा परिस्थितीत इशांतसारख्या वरिष्ठ गोलंदाजाला ड्रेसिंग रुममध्ये बसवून उपयोग नाही. या निमित्ताने आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा किंवा इशान पोरेल यांना संघात स्थान मिळण्याची संधी मिळू शकते.
तसेच गेल्या दोन वर्षांपासून धावा काढण्यासाठी झगडणाऱ्या रहाणे आणि पुजारा यांना रणजीमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आल्यास राष्ट्रीय संघातील पुढील वाटचाल कठीण होईल. हनुमा विहारी आणि शुभमन गिल यांनी चांगली कामगिरी केली तर या दोन अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या-
वहीदा रहमान: लतादीदींनी त्या दिवशी माझ्यासाठी पाण्याच्या अनेक बादल्या भरून आणल्या, नरगिसदेखील झाली होती अवाक
२७ वर्षांपासून लतादीदींची सेवा करत होते महेश राठोड, आता त्यांच्या जाण्याने झालेत अस्वस्थ
PHOTO: मरून ड्रेसमध्ये नोरा फतेहीने सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, चाहते झाले घायाळ