this mla chances to minister in eknath shinde | राज्यात शिंदे-भाजप सरकार येऊन आता तीन महिन्यांपेक्षा जास्त झाले आहे. या सरकारचा राज्यमंत्रिळाचा विस्तार होत नव्हता. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. त्यानंतर काही खात्यांचा विस्तार करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले आहे. या विस्तारात राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी या बहुप्रतिक्षित विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये शिंदे गटातील ४ आमदारांना आणि भाजपच्या ४ आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातून आधीच्या मंत्रिपदाच्या विस्तारामुळे काही आमदार नाराज आहे. त्यामुळे त्यांच्या गटातून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिरसाट यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता जास्त आहे.
तसेच संजय शिरसाट यांच्याशिवाय भरत गोगावले, बालाजी किणीकर, योगेश कदम, सदा सरवणकर, प्रकाश आबीटकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे यांच्या गटातून नक्की कोणाला मंत्रिपद मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू हे सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले होते. पण यंदा त्यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर नाराजीही व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता जास्त आहे.
तसेच भाजपबद्दल बोलायचे झाल्यास भाजपच्या ४ आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. पण भाजपकडून कोणाची वर्णी लागणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. भाजपमध्येही अनेक आमदार मंत्रिपदासाठी उत्सुक आहे. पण अजून कोणाला मंत्रिपद मिळेल याची चर्चा झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
Akola : मनात आलं अन् यमराजने परत पाठवलं, अकोल्यात थेट तिरडीवरुनच उठून बसला तरुण
Virat Kohli : हे तर भारताचे दोन वाघ आहे…; विराट-सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून चाहते झाले भलतेच खुश
Virat Kohli : विराट-सूर्यकुमार पुढे नेदरलँड्स पडले थंड, टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय