गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देणाऱ्या हार्दिक पटेलने (Hardik Patel) काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या राजीनाम्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना हार्दिक म्हणाले की, काँग्रेसवर जो विश्वास होता तो ते पूर्ण करू शकले नाही. ना मला काम करण्याची संधी मिळाली, ना त्यांनी मला कधी काम दिले. काँग्रेसवर हल्लाबोल करताना हार्दिक पटेल म्हणाले की, उद्योगपती त्याच्या मेहनतीने बनतो, जर उद्योगपतीने मेहनत केली तर त्याला सरकार मदत करत आहे असा कलंक आपण लावू शकत नाही. तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर अदानी, अंबानी यांना शिव्या देऊ शकत नाही. पंतप्रधान जर गुजरातचे असतील तर तुम्ही त्यांचा राग अदानी, अंबानींवर का काढता?(Congress, resigned, Hardik Patel)
काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी सांगितले की, त्यांनी पक्षातील तीन वर्षे वाया घालवली. यासोबतच त्यांनी आम आदमी पार्टी (आप) किंवा भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये सामील होण्याचा कोणताही निर्णय सध्या घेतलेला नाही. पटेल (२८) यांनी पत्रकार परिषदेत अयोध्या प्रकरणात भाजपच्या भूमिकेचे कौतुक केले आणि कलम ३७० च्या तरतुदी रद्द केल्याबद्दल पक्षाचे कौतुक केले.
ते म्हणाले की, काँग्रेसकडे दूरदृष्टी नाही आणि पक्षाचे नेते गुजराती लोकांसोबत पक्षपात करतात. या वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि पटेल यांनी बुधवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, म्हणाले पक्षाचे प्रमुख नेते त्यांच्या मोबाइल फोनवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि गुजरात काँग्रेस नेते त्यांच्यासाठी चिकन सँडविचची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ते भारतीय जनता पक्ष किंवा आपमध्ये सामील होतील का, असे विचारले असता पटेल म्हणाले, मी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतलेला नाही, मग तो भाजप असो किंवा आप. मी जो काही निर्णय घेईन, तो जनतेचे हित लक्षात घेऊनच घेईन. पटेल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची काँग्रेसबद्दलची सर्वात मोठी तक्रार ही होती की, जुलै २०२० मध्ये त्यांना पक्षाच्या राज्य युनिटचे कार्यवाहक अध्यक्ष बनवल्यानंतरही त्यांना कोणतीही अर्थपूर्ण भूमिका देण्यात आली नाही.
ते म्हणाले की, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे (ज्याचे नेतृत्व पटेलांनी केले होते) काँग्रेसला खूप फायदा झाला हे वास्तव आहे. मात्र कार्यवाह अध्यक्ष बनवूनही मला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मला पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांनाही बोलावले जात नव्हते. तीन वर्षांत पक्षाने माझी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, CAA किंवा वाराणसी मशिदीत सापडलेले (कथित) शिवलिंग यासारख्या हिंदू मुद्द्यांवर पक्ष कधीही बोलला नाही.
अयोध्या प्रकरणात सत्ताधारी भाजपच्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे, असे पटेल म्हणाले. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते आणि माझ्या कुटुंबाने राम मंदिराच्या उभारणीसाठी २१ हजार रुपयांची देणगीही दिली होती. कलम ३७० हटवून भाजपनेही चांगले काम केले आहे. जे चांगलं ते चांगलं म्हणण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही. पटेल म्हणाले की, गुजरात काँग्रेसमध्ये जातीचे राजकारण खूप आहे आणि याच आधारे निवडणुकीत तिकीट वाटप आणि पक्षाचे पदाधिकारी नेमले जातात.
महत्वाच्या बातम्या-
ज्ञानवापी मशिद वाद: काँग्रेस नेत्याची सरकारला धमकी, म्हणाला, सरकारने बळजबरी केली तर..
काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा खासदारकी मिळणार? राजकीय घडामोडींना वेग
गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला भलेमोठे खिंडार; हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा
धक्कादायक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ‘या’ जेष्ठ नेत्याचं निधन, वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास