भारतीय क्रिकेट संघात (team india) निवड होणे जितके कठीण मानले जाते तितकेच टीम इंडियामध्ये स्वतःला टिकवून ठेवणे कितीतरी पटीने कठीण आहे, कारण संघाबाहेर असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर मजबूत स्पर्धा देतात. भारताचे असे 4 खेळाडू आहेत, ज्यांची कसोटी कारकीर्द जवळपास संपली आहे आणि भारतीय कसोटी संघाचे दरवाजेही त्यांच्यासाठी बंद झालेले दिसत आहेत, परंतु त्यांनी अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही. चला या 4 खेळाडूंवर एक नजर टाकूया:
1. मुरली विजय
भारतासाठी कसोटी पदार्पण केल्यापासून, मुरली विजयने अनेक वर्षांपासून टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. 2018 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मुरली विजय भारतीय क्रिकेट संघाचा शेवटचा भाग होता, परंतु त्या दौऱ्यात मुरली विजय चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्यामुळेच त्याला संघातून वगळण्यात आले. मुरली विजयने नोव्हेंबर 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा सामना खेळला.
मुरली विजयच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने 61 कसोटी सामन्यांमध्ये 38.29 च्या सरासरीने 3982 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या त्याने 12 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली. 37 वर्षीय मुरलीला आता संघात स्थान मिळण्याची शक्यता खुप कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तो देशांतर्गतसुद्धा क्रिकेट खेळत नाही.
2. करुण नायर
जेव्हा करुण नायरने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले तेव्हा करुण नायर हा लांबलचक शर्यतीचा घोडा आहे असे वाटले, पण तसे दिसले नाही. त्रिशतक झळकावल्यानंतर तो चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होऊ शकला नाही, त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.
करुण नायरने नोव्हेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर मार्च 2017 मध्ये तो अखेरचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसला. त्याने आपल्या कारकिर्दीत केवळ 6 कसोटी सामने खेळले असून 62.33 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 303 धावा आहे.
3. शिखर धवन
2013 मध्ये, शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले, परंतु 2018 च्या इंग्लंड दौऱ्यावर खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात आले. धवनच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी आतापर्यंत 34 कसोटी सामने खेळले आहेत आणि 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याने आणखी 7 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १९० धावा आहे. धवन आता 36 वर्षांचा आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून त्याच्यासाठी कोणतीही जागा रिक्त नाही आणि आता पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची फारशी आशा नाही.
4. रिद्धिमान साहा
ऋद्धिमान साहा खूप चांगला यष्टिरक्षक आहे. मात्र, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो केवळ 40 कसोटी सामने खेळू शकला आहे. 37 वर्षीय वृद्धीमान साहाबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने निवडकर्त्यांना सांगितले आहे की, साहा त्यांच्या भविष्यातील योजनांमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता या खेळाडूची पुन्हा कसोटी संघात पुनरागमन होण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे. साहाच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 40 कसोटीत 29.41 च्या सरासरीने 1353 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत.
महत्वाच्या बातम्या
मी टू मुव्हमेंटमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीचे पुन्हा गंभीर आरोप; म्हणाली, मी आत्महत्या करणार….
अनेक वर्षांची भाजपची सत्ता उलथवत काॅंग्रेसचा दणदणीत विजय; ७ महापालिका घेतल्या ताब्यात
VIDEO: Urfi Javedला पारदर्शक ड्रेसमध्ये पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी, लुक पाहून सगळेच झाले बेभान
शिंदे गटात गेलेल्या आढळराव पाटलांना शिवसैनिकांची हातपाय तोडण्याची धमकी; १७ जणांवर गुन्हा दाखल