Share

आफताबने श्रद्धाचा खून केल्यावर गुगलवर सर्च केल्या ‘या’ दोन गोष्टी; कबुलीनाम्यातून समोर आले भयानक सत्य

aftab shraddha

धक्कादायक कृत्याने संपूर्ण देश हादरला आहे. प्रियकर इतका क्रूर असू शकतो यावर लोक विश्वास ठेवू शकत नाहीत.चक्क प्रियकराने त्याच्यासोबत राहणाऱ्या मुलीच्या शरीराचे ३५ तुकडे करू ते लांपास केले आहेत. या गुन्ह्यासाठी आरोपी आफताबला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तब्बल सहा महिने पोलिसांना चकमा देणारा आफताब (Aftab ) आता तुरुंगात आहे.

आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर चोवीस तास नजर ठेवण्यात येत आहे. दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वॉकर (वय २६) या तरुणीच्या हत्येप्रकरणी आणखी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

१८ मे २०२२ रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाच लावण्यासाठी त्याने वेग वेगळे प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिच्या शरीराचे तुकडे करता यावेत, यासाठी त्याने मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास केला. आफताबकडील इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आहे गुगल सर्च हिस्ट्री तपासल्यानंतर आफताबच्या कबुलीनामा पडताळून पाहणार आहेत.

आरोपी तरुण आफताब अमीन पूनावाला (वय 28) याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे चार ठिकाणी ठेवले होते. आरोपी आफताब पूनावाला याला जंगलात आणण्यात आले जेथे त्याने श्रद्धाच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावली होती. श्रद्धा ही महाराष्ट्रातील पालघरची रहिवासी होती. ती २०१९ मध्ये आफताबसोबत कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाचे कुटुंबीय त्यांच्या नात्याला विरोध करत होते. घरच्यांचा विरोध पाहून श्रद्धा आणि आफताब आधी नायगाव आणि नंतर दिल्लीला आले. असे म्हटले जाते की, श्रद्धाला आफताबसोबत लग्न करायचे होते, पण तो त्यासाठी तयार नव्हता आणि दोघांमध्ये भांडण व्हायचे.

एके दिवशी आफताबने श्रद्धाची हत्या केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ३०० लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने मृतदेहाचे अवयव जंगलात फेकून दिले. यादरम्यान त्याने मित्र आणि शेजाऱ्यांचीही दिशाभूल केली.

महत्वाच्या बातम्या – 

हे तर गटार दर्जाचं राजकारण! आव्हाडांवरील घाणेरड्या आरोपांमुळे समाजसेविका शिंदे सरकारवर संतापल्या

Mumbai : मला इथून घेऊन जा, नाहीतर आफताब आज रात्री मला;श्रद्धाचा शेवटचा मेसेज आला समोर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now