चीनसह ‘या’ २४ देशांनी संयुक्त राष्ट्रात रशियाचे उघडपणे केले समर्थन, वाचा संपूर्ण यादी

युक्रेनच्या (Ukraine) बुचा शहरात रशियन (Russian) सैनिकांनी केलेल्या कथित हत्याकांडानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (United Nations General Assembly) मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) रशियाला वगळण्याच्या ठरावावर मतदानाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, या मोहिमेत रशियासह जगातील एकूण 24 देशांनी रशियाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आणलेल्या या ठरावात 93 देशांनी रशियाला बेदखल करण्याच्या बाजूने मतदान केले, तर विरोधात फक्त 24 मते पडली.(These 24 countries have openly supported Russia)

यादरम्यान चीनने उघडपणे रशियाला पाठिंबा देत प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. त्याचवेळी भारत, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबियासह 58 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. रशियाच्या विरोधात ठराव पास झाला, पण ही मतदानाची पद्धत आणि इतर देशांची भूमिका पाहता रशियाचा पाठिंबाही वाढल्याचे समजते.

24 देशांनी उघडपणे रशियाला पाठींबा दिला. त्यामध्ये अल्जेरिया, बेलारूस, बोलिव्हिया, बुरुंडी, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, चीन, काँगो, क्युबा,उत्तर कोरिया, इरिट्रिया, इथिओपिया, गॅबॉन, इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, लाओस, गार्डनर, निकाराग्वा, रशिया, सीरिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, व्हिएतनाम, झिंबाब्वे या देशांचा समावेश आहे.

युक्रेनच्या बुचा शहरात रशियन सैनिकांनी नागरिकांची हत्या केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी 47 सदस्यीय मानवी हक्क परिषदेतून रशियाला निलंबित करण्याची मोहीम सुरू केली. संयुक्त राष्ट्र महासभेने गुरुवारी रशियाला जगातील सर्वोच्च मानवाधिकार संघटनेतून निलंबित करण्यासाठी मतदान केले. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने मानवी हक्कांचे घोर उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. अमेरिका आणि युक्रेनने रशियन सैनिकांच्या या कृत्याला युद्ध गुन्हा म्हटले आहे.

पक्ष आणि विपक्ष दोन्ही देश या मतदानापासून दूर राहिले. भारतासह एकूण 58 देश अनुपस्थित होते. या प्रस्तावासोबत अधिकाधिक देशांनी यावे, असा अमेरिकेचा प्रयत्न होता. भारतासह अनेक देशांकडून त्यांच्या बाजूने दबाव होता पण भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, ब्राझील, इंडोनेशिया, घाना, इराक, कुवेत, नेपाळ, मलेशिया, मालदीव, सुरीनाम, सिंगापूरसह 58 देश मतदानापासून दूर राहिले.

महत्वाच्या बातम्या-
रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतलेला हा निर्णय ठरला गेमचेंजर, अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा
चीनला आम्ही बघून घेऊ, रशियाच्या तेलावर अवलंबून असलेल्या पाश्चात्य देशांनी आम्हाला भाषण देऊ नये
चीनने आक्रमक केल्यास रशिया मदत करेल याची अपेक्षा ठेऊ नका कारण.., अमेरिकेचा भारताला सूचक इशारा
भारताचे चीनसोबत युद्ध झाले तर रशिया कोणाची साथ देणार? बाकीच्या देशांची काय भूमिका असेल?