गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर थेरगाव क्वीन चांगलीच चर्चेत आहे. थेरगाव क्वीन असे इंस्टाग्रामवर अकाऊंट असलेल्या तरुणीचे खरे नाव साक्षी महाले असे आहे. तिने इंस्टाग्रामवर रिल्स बनवून लोकांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.
अश्लील आणि शिवीगाळ केलेल्या व्हिडिओमुळे साक्षी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. पण अशा व्हिडिओंमुळे लोकांनी तिच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या थेरगाव क्वीनला चांगलीच अद्दल घडवली आहे. तसेच तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडून दिले होते. तसेच तिचा मित्र कुणाल कांबळे नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी मागितली होती. तोही तिच्यासोबत शिवीगाळ करत व्हिडिओ बनवत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही धडा शिकवत, माफी मागायला लावली. त्यानंतर त्यालाही सोडून देण्यात आले.
https://www.instagram.com/reel/CZgB0SAq7z3/?utm_source=ig_embed&ig_rid=019a13c3-32c9-4cf0-aef5-2de9293077db
आता हे सर्व प्रकरण चर्चेत असताना या तरुणीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तरुणाच्या खांद्यावर बसलेली दिसून येत आहे. हा व्हिडिओ जेलमधून बाहेर आल्यानंतरचा आहे, असे म्हटले जात आहे. पण नक्की हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत माहिती मिळाली नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणी एका तरुणाच्या खांद्यावर बसलेली आहे. पण ती खुप शांत असल्याचे दिसून येत आहे. थेरगाव क्वीन या इंस्टाग्राम हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे.
या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी कमेंट केल्या आहे. तसेच पोलिसांनी जेलमध्ये टाकलं तरी हिची मस्ती गेली नाही, असे काही लोकांनी म्हटले आहे. काहींनी म्हटले आहे की, पोलिसांनी इतकं समजवलं तरी या मुलीला काही लक्षात आले नाही. तर एकाने म्हटले की हे सर्वजण बेरोजगार आहे. तसेच काहींना तर असाही प्रश्न पडला आहे की, मुलगी हसत का नाहीये?
महत्वाच्या बातम्या-
काॅंग्रेस देणार गरीबांना न्याय; महीन्याला ६ हजार रूपये मोफत देण्याचा राहूल गांधींचा शब्द
…तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या’, तिकीट नाकारलेल्या पार्सेकरांचे फडणवीसांना खुलं आव्हान
काळीज फाटलं! जन्मदात्या आईवर आली बाळाला विकण्याची वेळ आली; घटना वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पानी