मध्यंतरी भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचारांचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लवकरच नाईक यांना अटक होईल अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
लैंगिक अत्याचार आणि धमकीप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी नाईक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी “दोघांमधील संबंध हे संमतीने होते. ते १९९३ पासून नातेसंबंधात होते. त्याला सकृतदर्शीनी बलात्कार म्हणता येणार नाही” असे न्यायालयाने नमूद केले आहे.
तसेच अटक झाल्यास वैयक्तिक बंधपत्रावर सुटकेचे आदेश देत पोलिसांकडे रिव्हॉल्वर जमा करण्यास न्यायलयाने नाईक यांना सांगितले आहे. यामुळे नाईक यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचार आणि धमकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, नाईक या महिलेसोबत गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना एक मुलगाही आहे. त्यामुळे या मुलाला वडिलांचे नाव मिळावे अशी मागणी या महिलेने नाईक यांच्याकडे केली होती. मात्र या गोष्टीला नाईक यांनी नकार दिला. त्यांनी महिलेसोबत वाद घालत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
परंतु हे सर्व आरोप नाईक यांनी फेटाळून लावले आहेत. आता उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने नाईक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोधाशोध सुरू होती. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील दखल घेत गणेश नाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या
आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील.., योगी सरकारचा महाराष्ट्र सरकारला अप्रत्यक्ष टोला
आमच्या सणांना एक दिवसाची परवानगी, मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस परवानगी कशी मिळाली? राज ठाकरे आक्रमक
…तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, राज ठाकरे फुकले रणशिंग, भोंगा प्रकरण चिघळणार?
वसंत मोरे मनसेला ठोकणार रामराम? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण