Share

‘दबंग ४’ साठी सलमान खानने ‘या’ दिग्दर्शकाशी केली हातमिळवणी; बॉक्स ऑफिसवर होणार धमाका

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या अनेक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अभिनेता सध्या आगामी चित्रपट ‘टायगर 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खानने त्याच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, असा खुलासाही झाला आहे.

याशिवाय तो लवकरच ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलमध्ये काम करणार असल्याचेही सांगितले. आता समोर आलेल्या ताज्या बातम्यांनुसार, अभिनेत्याने ‘दबंग 4’साठी या प्रसिद्ध दिग्दर्शकाशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या उत्सुकता शिगाला जाऊन पोहचल्या आहेत.

रिपोर्टनुसार, तिग्मांशु धुलिया सलमान खानच्या दबंग 4 मध्ये काम करत आहे. जवळच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिग्मांशु दबंग 4 च्या स्क्रिप्टवर एक वर्षापासून काम करत आहे आणि पुढच्या वर्षी एक नरेशन होईल. आता चित्रपटाची स्टोरी काय असेल याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दबंग फ्रँचायझीसाठी तिग्मांशु धुलियाने जी काही कल्पना दिली दिली आहे त्यामुळे सलमान खान खूप प्रभावित झाला आहे. संपूर्ण टीमला चुलबुल पांडेच्या प्रतिष्ठित व्यक्तिरेखेसाठी नवीन दृष्टिकोन आणायचा आहे. स्क्रिप्ट आऊट झाल्यावर फायनल कॉल घेतला जाईल.

सलमान आणि त्याचा निर्माता भाऊ अरबाज खान या दोघांनाही असे वाटते की दबंगसाठी तिग्मांशु योग्य पर्याय असेल. तिग्मांशु साहेब बीवी और गँगस्टर आणि पान सिंग तोमर यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

तिग्मांशूने 2015 मध्ये सलमानला एक स्क्रिप्टही सांगितली होती. मात्र, तेव्हा परिस्थिती चांगली नव्हती. सलमान खानला चुलबुलच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाशिवाय सलमान खान लवकरच शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात
कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम
धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now