महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर राज्यपालांवर टांगती तलवार धरली आहे. प्रत्येक आघाडीचा नेता राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवताना दिसत आहे. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुध्दा या वादग्रस्त मुद्दयांवर प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज्यपालांवर टीका करत म्हटले आहे की, राज्यपालांना इथून उचलायला एक फोनच बस्स झाला. राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाच सुध्दा काम नाही. आव्हाड यांनी केलेल्या या सुचक वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. जितेंद्र आव्हाड पुण्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
त्यांनी यावेळी म्हटले की, राज्यपालांवर मोदी काय बोलले मला माहीत नाही, मी पाहिलं नाही. परंतु त्या राज्यपालांना इथून उचलायला एक फोन बस झाला. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर खरंच प्रेम असेल, तसेच राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं वाटत असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात असेल तर मोदींसाठी फोनवरून एक मिनिटाचं काम आहे. प्रेम असेल तर त्यांनी राज्यपालांना एका मिनिटात हटवावे.
यानंतर भाजपवर टीका करत, “आमची मुंबई येथे बैठक झाली, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी आपण ३० वर्षे सापाच्या पिल्लाला पाळले. आता ते वळवळू लागले आहे. फुंकर मारतोय. आम्ही विष प्यायलो. त्यामुळे आता महाविकास आघाडीत एकत्र राहून लढा द्या” अशी टोलेबाजी आव्हाड यांनी केली आहे.
इतकेच नव्हे तर, “मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि तुमचा विधिमंडळातील जो नेता असतो त्याचा आदेश मानायचा हा आमच्या साहेबांचा आदेश आहे. त्यामुळे आमचा इथला विधीमंडळातील नेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे आज ते म्हणतात की महाविकास आघाडी झालीच पाहिजे तर ती व्हायलाच पाहिजे” असे आव्हाड यांनी यावेळी बोलून दाखवले.
दरम्यान शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी समर्थ होते असे वक्तव्य एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यानंतर या वक्तव्यांचा निषेध नोंदवत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. परंतु याच वेळी भाजप नेते राज्यपालांची बाजू सावरताना दिसले.
ताज्या बातम्या
शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर, खोलीत आढळले रक्ताचे डाग
शूटिंग सुरू असताना सनी लिओनीचा अपघात, चेहऱ्याची झाली भयानक अवस्था; पहा हादरवून टाकणारा व्हिडीओ
बीडमध्ये तृतीयपंथी सपनाची पार पडली हळद, उद्या बाळूसोबत अडकणार विवाहबंधनात
अमिताभ यांच्यानंतर ‘या’ सुपरस्टारसोबत काम करणार नागराज मंजुळे; म्हणाले, मी खूप दिवसांपासून त्यांच्यासोबत..