जीवे मारण्याच्या धमक्या, बलात्कारासारखे गंभीर आरोप झेलणारे भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या समर्थनार्थ करणी सेना उतरली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे बलात्कार नसतो, असं महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहतात, पती-पत्नीसोबत संबंध ठेवणे हा बलात्कार नाही, तर लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गणेश नाईकवर महिलेने बलात्काराचा गुन्हा का दाखल केला आहे. तिने स्वत: मूल असल्याचे मान्य केले आहे. नाईक यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या महिलेने हे आरोप केल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच केवळ ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने दीपा चौहान या महिलेने गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार नोंदवलेली आहे. त्यांच्यावरील गुन्हा हा त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. ते म्हणाले की, या महिलेने सांगितले आहे की, ती गेल्या 27 वर्षांपासून गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे.
गणेश नाईक यांनीही हे मान्य केलं आहे. या महिलेने एका विवाहित पुरुषाशी संबंध जोडला जो सामाजिकदृष्ट्या बेकायदेशीर आहे, म्हणून त्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली पाहिजे, असे ते म्हणाले. अजय सिंह सेंगर याबाबत माध्यमांशी बोलत होते.
वाचा काय आहे प्रकरण.. गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाईक यांच्याविरोधात महिलेने धमकी आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. दीपा चव्हाण नावाच्या महिलेने नाईक यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.
गणेश नाईक आणि मी लिव्ह इनमध्ये राहत होतो, त्यांच्याकडून मला एक मुलगाही झाला आहे. आता ते मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहे, अशी लेखी तक्रार या महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी मंगेशकर कुटुंबियांना मदत केली पण…’ छगन भुजबळांनी करून दिली आठवण
व्हिडीओत दिसणारी किरीट सोमय्यांची ‘ती’ जखम बनावट? पोलीसांनी उचललंल मोठं पाऊल
योगायोग की दुसरं काही? जेव्हा अथिया मॅच पाहायला येत नाही तेव्हाच केएल शतक झळकवतो
राष्ट्रवादीची महीला नेता थेट मोदींच्या घरासमोर करणार हनुमान चालीसा पठण; वाद आणखी चिघळणार?