Share

उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ जानकरांनांही जबर धक्का! पदाधिकाऱ्यांनी सांगितला पक्षावरच हक्क

mahadev jankar

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सेनेत उभी फुट पडली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे.

त्यानंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. 40 आमदारांसह अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. यामुळे सध्या शिवसेनेत अस्थिरतेच वातावरण निर्माण झालं आहे.

राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनाही जबर धक्का बसला आहे. जानकर यांच्या हुकुमशाही पद्धतीला कंटाळून साथ सोडण्याचा मोठा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

काल बारामती येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला तब्बल 22 जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत होती. विशेष बाब म्हणजे, या बैठकीत जानकर यांच्या विचारसरणीला बाजूला ठेवत कार्यकर्त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले.

वाचा बैठकीत घेण्यात आलेले निर्णय..?
या बैठकीत धनगर आरक्षणाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. धनगर समाजाचे प्रश्न यशवंत सेनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यांना हीन वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

यामुळेच आम्ही त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला, असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून उभा राहिला असल्याकारणामुळे यापुढे पक्षावर आमचाच हक्क असल्याच त्यांनी स्पष्टच सांगितलं. यामुळे आता महादेव जानकर यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
सुष्मितासोबतच्या नात्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदींनी सुनावले; म्हणाले, मी अजूनही मध्यम वयात…
शिंदे सरकारची घटीका भरली? सर्वोच्च न्यायालय ‘या’ तारखेला ठरवणार शिंदे सरकारचे भवितव्य
नगरच्या पठ्ठ्याच्या ‘या’ जुगाडावर आनंद महिंद्रा सुद्धा झाले फिदा; फोल्डिंग जिना पाहून म्हणाले…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now