Share

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर…; उद्धव ठाकरेंचे आमदारांना भावनिक आवाहन

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजलेली आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ३६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे.

हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्या चाललेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे ५ वाजता फेसबूक लाईव्हद्वारे प्रतिक्रिया देणार होते. ते राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित होत होता. जेव्हा ते लाईव्ह आले तेव्हा ते भावनिक झालेले पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना अट घातली. ते म्हणाले की, बंडखोर आमदारांनी सांगितलं तर मी आता राजीनामा देतो. पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदाने मान्य आहे. मी शिवसेनेचं पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे. तुम्हाला जर वाटत असेल मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी मी नालायक आहे तर मी मुख्यमंत्रीपद सोडायलाही तयार आहे.

ते असेही म्हणाले की, माझेच लोक माझ्यावर अविश्वास दाखवतात. मी वर्षा सोडून मातोश्रीवर जायलाही तयार आहे. मी राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो, बंडखोर आमदारांनी ते राज्यपालांनां द्यावं अशीही अट त्यांनी बंडखोर आमदारांना घातली. राज्यपाल म्हणाले, उद्धव ठाकरेंनी स्वता यावं तर मी यायला तयार आहे पण मला कोरोना झाला आहे.

पुढे ते म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीला माझ्यावर अजूनही विश्वास आहे. पवारांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री झालो. चर्चा करायला समोरा समोर या असं बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करायला तयार आहे.

फक्त बंडखोरांनी सांगावं, लगेच राजीनामा देतो, मुख्यमंत्रीपद सोडतो. फक्त माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची वेळ आणू नये. एकाने जरी माझ्याविरोधात मतदान केलं तर ती लाजीरवाणी गोष्ट आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आता यावर बंडखोर आमदार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेवरही सगळ्यांचे लक्ष राहिल.

महत्वाच्या बातम्या
..तर मग आज अजय देवगणच्या पत्नीचे नाव काजोल नसते, शोमू मुखर्जींनी ठरवलं होतं ‘हे’ नाव
”तुम्हीच सांगा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळायला नालायक आहे, लगेच पद सोडतो”
पक्षाच्या बैठकीला हजर राहा नाही तर पक्ष सोडा; शिवसेनेने आमदारांना धाडली नोटीस
एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंसोबतचा ‘तो’ वाद पक्षाला भोवला, दोन दिवसांपूर्वीच पडली वादाची ठिणगी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now