Share

उद्धव ठाकरेंनी ‘हा’ निर्णय घेतला तर फक्त ११ दिवसातच पडणार एकनाथ शिंदेंचे सरकार, वाचा काय आहे कायदा

गेल्या दहा दिवसांपासून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन सरकार स्थापन केले होते. (then eknath shinde resign cm position)

एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री झालेले असले तरी अजूनही ते पक्षांतर कायद्याच्या कचाट्यातून मुक्त झालेले नाही. एकनाथ शिंदे यांना या मोठ्या संकटातून सुटका करावी लागणार आहे. नाहीतर त्यांचे हे मुख्यमंत्रिपद हे फक्त ११ दिवसांचे असून त्यांना त्याचा राजीनामाही द्यावा लागू शकतो.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही व्हीप काढण्याचा अधिकार आहे. तसेच सध्या सर्वोच्च न्यायालयात अपात्रेचा खटला प्रलंबित आहे. हा खटल्याचा निकाल जर उद्धव ठाकरे यांच्याकडून लागला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

याबाबत आता कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जयंत जायभावे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय संपलेला नाही. तो विषय जिवंत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अजूनही त्यावर निकाल दिलेला नाही, असे जयंत जायभावे यांनी म्हटले आहे.

तसेच केवळ सभागृहात पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणूनच नव्हे तर सभागृहाबाहेर देखील पक्षविरोधी कारवाई केली, तरीही लोकप्रतिनिधी अपात्र ठरू शकतील. यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जर आपल्या भूमिकेवर ठाम असतील, तर हा विषय सर्वोच्च न्यायालयात पुढे सुद्धा सुरु राहील, असेही जयंत जायभावे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन बाहेर पडले आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गंभीरपणे एकमेकांच्या विरोधात राहिले, तर या प्रकरणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालूच राहणार. अशात आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे, असेही जयंत जायभावे यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद अजूनही धोक्यात आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी आमदारांना मतदान करावे लागणार आहे. त्यावेळेस पक्षप्रमुखांकडून व्हीप काढला जाईल. त्यावेळी पक्षप्रमुखांनी व्हीप काढला की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या विरोधात मतदान करायचे किंवा मतदान करायचे नाही. तर बंडखोरांना त्याचे पालन करावे लागेल, असेही जयंत जायभावे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
आता खरी अग्निपरीक्षा! शिंदे गटात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; असं असेल नवीन मंत्रिमंडळ
‘ज्याच्यासोबत मी अडल्ट सीन केले तो माझा भाऊ’; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली खळबळ
आधी गडकरी आणि आता फडणवीस…; ब्राम्हण महासंघांचे भाजपवर गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now