शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून एकनाथ हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि अपक्ष आमदारांच्या गटासह आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. दाव्यांचे चक्र सुरूच आहे. एकामागून एक विधाने समोर येत आहेत.(Eknath Shinde, rebel MLA, Shiv Sena, BJP, Uddhav Thackeray)
इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सरकारला वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. दोन्ही बाजूंमधील भांडण सुरूच आहे. पक्षांतर विरोधी कायदा टाळण्यासाठी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३७ आमदारांचे आवश्यक संख्याबळ जमा केले आहे. मात्र अविश्वास प्रस्तावाचे पत्र अद्याप राज्यपालांना देण्यात आलेले नाही.
दरम्यान, शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा अर्ज विधानसभेच्या उपसभापतींना देण्यात आला आहे. उपसभापती लवकरच सर्वांना नोटीस देऊन आपले म्हणणे मांडण्यास सांगतील. अशा स्थितीत त्यांचे सदस्यत्व बरखास्त झाल्यास एकनाथ शिंदे यांची स्वतःची आमदारकी जाणार आहे, म्हणजे इतक सर्व केलेल्यावर पाणी पडणार आहे, पण त्याला अजून वेळ आहे.
तसेच, असे झाल्यास एकनाथ शिंदे गट न्यायालयात जाणे स्वाभाविक आहे. मात्र त्याआधी एकनाथ शिंदे यांच्यासमोर अविश्वास ठरावासाठी राज्यपालांना पत्र पाठवणे हाच उत्तम पर्याय उपलब्ध आहे. महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचिव डॉ.अनंत काळसे यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे गटाला अविश्वास ठराव आणून सरकारविरोधात राज्यपालांना पत्र लिहून विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी आहे. पण यातही मोठा अडथळा आहे.
याचाच अर्थ पक्षांतर कायद्याच्या अनुसूची १० नुसार एकनाथ शिंदे गटाला कोणत्याही एका पक्षात विलीन करावे लागेल. त्यामुळे ते कोणत्या पक्षात विलीन होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते भाजपमध्ये विलीन झाल्यास त्यांचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये उपस्थित असलेले आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात ते विलीन होतील का?
विशेष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार असून ते दोघेही सध्या एकनाथ शिंदे गटाकडे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, दोन्ही परिस्थितीत एकनाथ शिंदेंचा शिवसेना पार्टी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असल्याचा दावा निरर्थक ठरणार हे स्पष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दिला एकनाथ शिंदेंना पाठिंबा; म्हणाले, ते माझ्या सख्ख्या भावासारखे
..म्हणून आपल्यावर ही वेळ आली, एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी सांगितलं कारण
एकनाथ शिंदेंचे आमदारांबाबतचे ते आरोप खोटे; गृहमंत्र्यांनी शिंदेंना तोंडावर आपटवले
एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; ३८ आमदार जमवूनही स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही