Share

महीलेने ब्रेकऐवजी दाबला ॲक्सीलेटर, पुढे जे घडलं ते अतिशय भयानक होतं; पाहा व्हिडीओ

आजकाल अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर याचे विविध व्हिडीओ (video) देखील व्हायरल होत असतात. दरम्यान गुजरात येथील वडोदरा मधून एक व्हिडिओ समोर येत आहे. यामध्ये एक कार थेट क्रॉकरी स्टोअर मध्ये घुसली असून यामुळे दुकानमालकाचे चांगलेच नुकसान झाले आहे.

वडोदरातील अलकापुरी भागात गाडी चालवणाऱ्या एका महिलेने गाडी पार्क करत असताना ब्रेक ऐवजी अँक्सिलेटर दाबला. यापुढे गाडी सरळ जाऊन क्रॉकरी स्टोअर मध्ये घुसली. विशेष म्हणजे गाडी पायऱ्या चढून दुकानात घुसली आहे. हा विचित्र अपघात पाहणारे देखील अचंबित झाले आहेत.

ही सगळी घटना क्रॉकरी स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @Narendra Singh या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातामध्ये कोणी सुद्धा जखमी झालेले नाही. दरम्यान क्रॉकरी स्टोअरचे मालक महेशभाई सिंधानी यांनी कार चालवणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. कारच्या या धडकेत दुकानाच्या एका बाजूच्या काचा फुटल्या आहेत. तसेच लाखो रुपये किमतीची क्रॉकरी जळून खाक झाली आहे.

दरम्यान गाडी चालवणारी महिला क्रॉकरी घेण्यासाठीच दुकानात आली होती. गाडीची दुकानावर धडक होताच मोठा आवाज झाला. यामुळे दुकानात काम करणारे कर्मचारी व आजूबाजूचे लोक देखील घाबरून गेले होते. अजब अपघात झालेला हा गजब व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now