फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात प्रकल्पासाठी पुण्याचीच जमीन योग्य असल्याच म्हंटलंय. तर दुसरीकडे गुजरातची अयोग्य असल्याच अहवालात नमूद केलं आहे. मात्र तरीही फॉक्सकॉन प्रकल्प गुजरतला नेण्यात आला आहे.
वाचा नेमकं फॉक्सकॉनच्या अहवालात काय म्हंटलंय?
सेमीकंडक्टर निर्मितीचा वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. मुख्य बाब म्हणजे या प्रकल्पातून १ लाख रोजगार महाराष्ट्रात उपलब्ध होणार होता. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अन् नंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. राज्यात सत्तांतर होताच २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीबरोबर या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती.
मात्र, मंगळवारी कंपनीने अचानक हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याची घोषणा केली. अन् त्यानंतर राज्यात एकच गोंधळ उडाला. विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी याच प्रकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली असल्याची देखील माहिती मिळाली आहे.
अशातच वेदांता-फॉक्सकॉनचा अहवालातील माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबाबत एक मोठा सर्व्हे केला होता. त्यावेळी त्यांनी जागेबाबत निरिक्षण करुन अहवाल सादर केला होता.
दरम्यान, आता वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालातील माहिती समोर आली आहे. या अहवालातून हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगावची साईट योग्य असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर गुजरातमधील ‘ढोलेरा’ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य असल्याच या अहवालामध्ये म्हंटलं आहे.