शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाने हल्ला केल्यामुळे अमेरिकेने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. यासाठी अमेरिका आपल्याला पूर्ण मदत करेल असे आश्वासन अमेरिकेने झेलेन्स्की यांना दिले आहे. परंतु झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा सल्ला नामंजुर केला आहे.
आपण किव्ह सोडून कुठे ही जाणार नसल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेला निरोप पाठवत, माझ्या देशात युद्ध सुरु आहे. सैनिक, नागरिक प्राणाची बाजी लावून लढत आहेत. अशावेळी आम्हाला शस्त्रांची, दारुगोळ्याची गरज आहे. पळून जाण्यासाठी गाड्यांची नसल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले आहे.
झेलेन्स्की यांनी अमेरिकेला पाठविलेल्या निरोपातून ते किव्ह सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर झेलेन्स्की यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत ते किव्हमध्येच खुलेआम सैन्यासोबत फिरत असल्याचे व बैठका घेत असल्याचे जाहीर केले आहे. व्हिडिओत झेलेन्स्की किव्हच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.
दुसरीकडे आपल्या देशाला वाचविण्यासाठी युक्रेन नागरीक रस्तावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेनमध्ये असणाऱ्या अनेक रशियन गाड्या फोडल्या आहेत. रशियाने देखील थेट किव्हच्या इमारतींवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. परंतु किव्हला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी युक्रेनचे सैन्य जीवाची बाजी लावत आहेत.
राजधानी किव्हवर रशियाने हल्ला केल्यामुळे तेथील आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. रशियाने उचलेल्या या पावलामुळे युरोपमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशा स्थितीत भारताचे अनेक नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी आज एअर इंडियाचे विमान बुखारेस्ट, हंगेरी आणि बुडारेस्टमध्ये पाठवण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे २०,००० भारतीय विद्यार्थी आणि नागरीक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी भारतीय विमान गेल्यानंतर या सर्वांजवळ पासपोर्ट, रोख रक्कम, इतर आवश्यक वस्तू आणि कोविड लसीकरण प्रमाणपत्रे बॉर्डर चेक पोस्टवर सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
..पण ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते, अमृता फडणवीसांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
पेट्रोल, डिझेलनंतर खाद्यतेलांचे भाव गगनाला भिडले; आजचे भाव वाचून तुमचेही डोके चक्रावेल
भर पत्रकार परिषदेत ‘या’ प्रश्नावर अजितदादा भडकले; “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”
भर पत्रकार परिषदेत ‘या’ प्रश्नावर अजितदादा भडकले; “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”