कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं जगभरात जनजीवन विस्कळीत झालेले असून आता कोरोनाचे वेगवेगळे व्हेरीएंट समोर येत असल्याने चिंता वाढली आहे. आधी डेल्टा आणि आता काही दिवसांपूर्वी घातक ओमायक्रॉनचा शिरकाव झाला होता. त्यामुळेच आता तिसरी लाट सुरू झाली आहे.
त्यावरच आता महाराष्ट्रातल्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. फेब्रुवारीच्या मध्यात भारतात बहुतांश ठिकाणी तिसरी लाट पिकवर असेल असं भाकीत जोशी यांनी केले आहे. महाराष्ट्रात कोविड टास्क फोर्सने कोरोना लाट थोपवण्यासाठी नेहमीच सरकारला वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. आता तिसऱ्या लाटेबद्दल शशांक जोशी यांनी केलेल्या भाकीताची मोठी चर्चा होत आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यात कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमायक्रॉनचे रुग्ण अधिक असल्याने चिंता आणि भीती वाढली होती. त्याच पार्श्वभूमीवर शशांक जोशी यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे आता त्यांचं हे वक्तव्य आगामी काळातील कोरोनाच्या साथीविषयी महत्त्वाचं मानलं जात आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा आफ्रिका पॅटर्नचा कहर भारतात सुरु आहे. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीत अचानक रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. आणि कोरोनाची तिसरी लाट उसळली आहे. असं यावेळी जोशी यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे आता महानगरांमध्ये अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या पीकवर जाऊ शकते. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या काळात देशातील प्रमुख शहरांमध्ये बहुतांश भागात रुग्णसंख्या पीकवर असेल. त्यानंतर मार्चमध्ये रुग्णसंख्येत घट होऊन लाट ओसरेल व एप्रिल महिन्यात स्थिती सामान्य होईल, अशीही शक्यता जोशी यांनी वर्तवली आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्यानंतर भारतात तिसरी लाट ओसरेल. कोणताही नवा व्हेरिएंट येत्या काळात आला नाही तर स्थिती वेगाने सुधारू शकते. असंही शशांक जोशी यांनी सांगितले. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर आणि तिसऱ्या लाटेबद्दल त्यांनी महत्त्वापूर्ण इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
या’ देवदूतामुळे डुग्गु सापडला, वाचा डुग्गूच्या शोधाची इनसाईड स्टोरी
कौतुकास्पद! बहिणीने टेलरिंगचे काम करून भावाला शिकवले, भावाने कलेक्टर होऊन नाव कमावले
सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत गेली होती मुव्ही पाहायला, ‘त्या’ फोटोने झाला मोठा खुलासा