Share

Eknath Shinde: राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज, एक फोटोसेशनसाठी आणि एक.., सुप्रिया सुळेंचा टोला

supriya sule

एकनाथ शिंदे (Eknath Shinde): महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राजकारणात अनेक बदलही घडूनही आले. नेत्यांच्या एकमेकांवरच्या टीकाही वाढीस लागल्या. टीकांमुळेही अनेक वाद उद्भवताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टोला लगावला आहे.

सुप्रिया म्हणाल्या की, सध्या राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक मुख्यमंत्री जे मंत्रालयात बसून काम करू शकेल आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील. पुढे त्या म्हणाल्या की, शिक्षणाचा मुद्दा खरं तर अत्यंत गंभीर आहे. त्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांनी बोलावं. त्याशिवाय काही होणार नाही.

कारण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि अशा पद्धतीने कोणी प्रशासनाच्या पातळीवर निर्णय घेत असेल तर शिक्षण मंत्र्यांनी यामध्ये लक्ष द्यायला हवं. मी स्वतः अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामांसाठी वेळ मागितली पण ते वेळ देत नाही. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे.

हे सरकार ज्या पद्धतीने सांगितलं जाते ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेले आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे. प्रशासनाबरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांची राज्याला गरज आहे असं मला वाटतं, अशी टीकाही सुळेंनी केली. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकार आणि निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावरही वक्तव्य केले.

त्या म्हणाल्या की, बारामतीच्या संदर्भात म्हटलं तर मी संविधानवरती विश्वास ठेवते. त्यावेळेस मला जेपी नड्डा यांचे वाक्य आठवतं की, या देशांमध्ये एकच पार्टी राहिली पाहिजे पण मी संविधानाप्रमाणे अनेक पार्टी राहावी या मताची आहे. बारामतीमध्ये कोणीही यावं त्यांचं स्वागत आहे आणि अशा पद्धतीने बारामती जरी असली तरीसुद्धा लोकांचा कौल कोणाला आहे तो निर्णय द्यायचा.

कुठलाही भाजपचा नेता बारामतीमध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच आहे. त्याला विरोध करण्याचं काहीही कारण नाही. लोकशाहीमध्ये सर्वांना पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा अधिकार आहे आणि त्याला आपली हरकत असण्याचे कारण नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सेंट्रल विस्टा असेल किंवा इतर वेगवेगळ्या मार्गांना नवीन नाव द्यायचा मुद्दा असेल.

माझ्यासमोर सध्या बेरोजगारी, महागाई हे जनतेच्या संबंधित महत्त्वाचे मुद्दे आहेत. केंद्र सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतर प्रकल्प राबवण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारी कशी कमी करता येइल यावर चर्चा होणं अपेक्षित आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या
Viral news : ऐकावं ते नवलच; जुळ्या मुलांची आई एकच मात्र वडील दोन, रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले
Amit Shah : अमित शहांभोवती घुटमळणाऱ्या तरूणाच्या आईवडिलांचा दावा, तो चुकीचं काम करूच शकत नाही, त्याला..
Politics: आता लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला बसणार मोठा धक्का, सर्वेतून झाला मोठा खुलासा
Politics: आता लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला बसणार मोठा धक्का, सर्वेतून झाला मोठा खुलासा

ताज्या बातम्या इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now