सध्या सर्वांनाचं कोरोना महामारीपासून थोडा ब्रेक मिळाला आहे, त्यामुळे आता दैनंदिन जीवन हे सुरळीत होत चालले आहे. सर्वच क्षेत्रातील काम पुन्हा सुरू झाले आहे. त्याचबरोबर आपली चित्रपटसृष्टी देखील पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाली आहे. याच दरम्यान अभिनेता विक्की कौशल(Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान हे देखील त्यांच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहेत. हे शूटिंग सध्या इंदोरमध्ये सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून हे दोघे आणि संपूर्ण टीम इंदोरमध्ये आहेत.(The shooting of Sara-Vicky’s film caused confusion among the college students)
हे कलाकार आणि त्यांची टीम इंदोरच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर अगदी आरामात शूटिंग करताना दिसत आहेत. शूटिंग सुरू असताना आपल्या आवडत्या कलाकारांना आणि त्यांची शूटिंग पाहण्यासाठी लोकेशनच्या आसपास लोकांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. कधीकधी या गर्दीमुळे कलाकारांना त्रास देखील होतो.
मात्र मंगळवारी (१८ जानेवारी) हे दृश्य उलट पाहायला मिळाले. हे शूटिंग कॉलेजमध्ये होते. याच दरम्यान हे शूटिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी डोके दुखीचे कारण बनले. या शूटिंगमुळे कॉलेजच्या परीक्षांवर परिणाम झाला. हा सर्व प्रकार इंदोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये घडला. जिथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.
शूटिंगमुळे परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुलांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे कॉलेजमध्ये एकच गोंधळ उडाला होता. या सर्व प्रकारामुळे परीक्षेच्या काही मिनिटे आधीच मुलांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होऊन मुले अस्वस्थ झाली होती. या शूटिंगमधील ख्रिश्चन कॉलेजमध्ये कौटुंबिक न्यायालयाचा सेट बांधण्यात आला होता. त्यामुळे शहराबाहेरून येथे परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी गोंधळात पडले आणि बराच वेळ महाविद्यालयाचा शोध घेत राहिले. सुरुवातीला महाविद्यालयाच्या गेटवरच विद्यार्थ्यांना थांबवण्यात आले.
यावर सर्व विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. बराच वेळ मुलं कॉलेजच्या बाहेर गेटवर उभी होती. परीक्षेच्या काही मिनिटे आधी मुलांना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला. ज्यामुळे अशी अनेक मुले होती, ज्यांना त्यांच्या वर्गाची आणि सीटची काळजी वाटत होती. विशेष म्हणजे परीक्षा असूनही कॉलेजमधील बैठक व्यवस्थेची माहिती देणारा ना बोर्ड होता ना कोणताही जबाबदार कर्मचारी होता.
त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात कॉलेज व्यवस्थापन हे अत्यंत बेजबाबदार दिसून आले. मात्र या उलट व्यवस्थापनाने या गोंधळासाठी मुलांना जबाबदार धरले. परीक्षेच्या दिवशी चित्रीकरणाच्या परवानगीच्या प्रश्नावर व्यवस्थापनाने सांगितले की, ‘शूटिंगची परवानगी फार पूर्वीच देण्यात आली होती. तर परीक्षांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात आले.’
चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, विक्की कौशल आणि सारा अली खानचा चित्रपट ‘लुका छुपी-२’ या चित्रपटाचे शूटिंग गेल्या एक महिन्यापासून इंदोर शहरात सुरू आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांचे चाहते खूप उत्सुक आहेत.