डॉक्टर पद घेण्यासाठी खूप वर्षांची मेहनत घ्यावी लागते. प्रचंड अभ्यास करून डॉक्टरांची पदवी मिळते. डॉक्टर जीव वाचवण्याचे काम करत असल्याने त्यांना देवासमान मानले जाते. मात्र, याच अशा एका डॉक्टरने अतिशय अमानुष कृत्य करून लोकांचा रोष ओढावून घेतला आहे. एकतर्फी प्रेमातून डॉक्टरने मुलीसोबत जे केले त्यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.
एकतर्फी प्रेमातून पुण्यातील एका डॉक्टरने भलताच कांड केला आहे. त्याने बीड मध्ये राहणाऱ्या आपल्या जुन्या वर्गमैत्रिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट काढून तिच्याच मैत्रिणींशी चॅटिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, डॉक्टरचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. संबंधित प्रकार लक्षात आल्यांनतर, पीडित युवतीने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल केल्यानंतर, तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला गेला, सायबर पोलिसांनी अखेर या गुन्ह्याची उकल केली. त्यांनतर बनावट खातं तयार करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका डॉक्टर युवतीच्या नावाने दीड महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर कोणीतरी बनावट अकाउंट तयार केले होते.
यासाठी पीडित युवतीचा फोटो आणि नावाचा वापर करण्यात आला होता. संबंधित अकाऊंटवरून आरोपीने पीडितेच्या मैत्रिणींशी चॅटींग करणे सुरु केले होते. पण, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पीडित डॉक्टर तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी इन्स्टाग्रामशी संपर्क करून संबंधित अकाउंटबाबत माहिती मागवली.
माहिती मिळाल्यानंतर उघड झाले की, डॉक्टर गोपाळ जे पुण्यात राहत होते त्यांनी पीडित तरुणीचा फोटो आणि नाव वापरून इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार केले होते. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी डॉक्टरला सायबर सेलमध्ये हजर राहण्यास सांगून त्याची कसून चौकशी केली. आरोपी डॉक्टरचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपी डॉक्टर दहिवाळ आणि फिर्याद ज्या तरुणीने दाखल केली ती वर्गमित्र आहेत. बीएचएमएसचं शिक्षण घेताना दोघेही एकाच वर्गात होते. याच ओळखीतून आरोपी पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला. यातूनच डॉक्टरने हा कांड केल्याचे पोलिसांच्या चौकशीमधून समोर आले. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला नोटीस बजावून तूर्तास सोडून दिले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
घरात मुलीचा जन्म झाला म्हणून आनंद गगणात मावेना, त्याने लोकांना मोफत वाटले पेट्रोल
टाटाचा धमाका! टाटाची सर्वात जुनी कार आणणार इलेक्ट्रीक व्हर्जनमध्ये; ‘हे’ असतील फिचर्स
करीना कपूरचे रात्रीचे ‘ते’ चॅट झाले लीक; वाचून तुम्हालाही येईल मजा…






