Homeमनोरंजनकरीना कपूरचे रात्रीचे ‘ते’ चॅट झाले लीक; वाचून तुम्हालाही येईल मजा...

करीना कपूरचे रात्रीचे ‘ते’ चॅट झाले लीक; वाचून तुम्हालाही येईल मजा…

बॉलिवूडची हॉट मॉम आणि सुपरहिट अभिनेत्री करीना कपूर खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा करीना कपूर तिच्या व्हाट्सऍप चॅटमुळे चर्चेत आली आहे. खरं तर, करीना कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूरची बहीण रिया कपूरने व्हाट्सऍपवर एक खास पदार्थ खाण्याबद्दल चॅट केले आहे.

करीना कपूर आणि रिया कपूरचे व्हाट्सऍप चॅट लीक झाले असून ही चॅट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणखी काही विचार करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की, करीना आणि रिया व्हॅनिला आइस्क्रीम आणि हॉट चॉकलेट खाण्याबद्दल बोलत आहेत. इतकेच नाही तर करिनाने तिच्या आणि रियामधील या मजेदार संवादाचा स्क्रीनशॉटही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

व्हाट्सऍप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत करीनाने लिहिले, ‘मला हे संभाषण खूप आवडते.’ असे म्हणत गप्पा सुरू होतात. रियाने करीनाला तुम्हाला हॉट चॉकलेट, व्हीप्ड क्रीम पाठवू का असे म्हंटले आहे. यावर करीना उत्तर देते, नाही, नाही, मला ते आवडत नाही. करीनाने नकार दिल्यानंतर रिया तिला पर्याय देते आणि म्हणते, ‘मग हॉट फज सॉस आणि व्हॅनिला आइस्क्रीम? करीनाला ते आवडले आणि तिने होकार दिला आणि म्हणले की हे चांगले आहे. यानंतर रिया म्हणाली ठीक आहे मी बिस्किटे आणि गरम फज पाठवत आहे, तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम ऑर्डर करू शकता.

करीना कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आणि तिचे कुटुंब, मित्रांसोबत फोटो शेअर करत राहते. करीना आणि सोनम कपूरची बहीण रिया कपूर खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि दोघी एकमेकांसोबत पार्टी करताना दिसतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात करीना कोविड पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रिया कपूर आणि सोनम कपूरची आई सुनीता कपूर यांनी करीना कपूरसाठी चॉकलेट पाठवले होते. करिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये सुनीता आणि रियाच्या या खास भेटवस्तूचे फोटोही शेअर केले होते आणि लिहिले, ‘या गोष्टींमुळे मला आनंद होतो.’ करीनाची पोस्ट रिपोस्ट करत रिया लिहिते, ‘चॉकलेटमुळे सर्वकाही चांगले होते.’

 

 

 

यापूर्वी करीना कपूर खानने एक सेल्फी पोस्ट केला होता. सेल्फी पोस्ट करण्यासोबतच तिने कॅप्शनमध्ये तिच्या पायजमा आणि लिपस्टिकचा उल्लेख केला होता. तसेच या कॅप्शनमध्ये करिनाने असेही लिहिले होते की, ती नवीन वर्षाच्या पार्टीसाठी तयार आहे. करिनाचे चाहते तिच्या आउटफिटबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते. या आउटफिटची खास गोष्ट म्हणजे त्याच्या खिशावर ‘के’ लिहिलेले होते आणि ती या ड्रेसवर अगदी चेरीसारखी दिसत होती.

करीना कपूर खान इन्स्टाग्रामवर खूप दिवसांपासून नसली तरी फार कमी कालावधीत ती सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली स्टार बनली आहे. या अभिनेत्रीला इंस्टा वर ८.५ मिलियन लोक फॉलो करतात. करीना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे म्हणणे चाहत्यांपर्यंत पोहोचवायचे असो किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही अपडेट्स द्यायचे असो, अभिनेत्री आता थेट तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करते.

महत्वाच्या बातम्या
ज्या रॅलीमध्ये मोदी पोहोचू शकले नाहीत तिथल्या खुर्च्या खरंच रिकाम्या होत्या का? वाचा यामागचं सत्य
बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम
अल्लू अर्जुनचा पुष्पा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज, वाचा किती वाजता पाहता येणार..