डॉक्टरांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोण हा नेहमी सकारात्मक असतो. डॉक्टरांना आपण देवदूत म्हणतो. आपला रुग्ण ठणठणीत बरा करण्याचे काम डॉक्टर करत असतात. मात्र अलीकडे डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण हे वाढलेले पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले देखील झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील.
काही ठिकाणी तर हॉस्पिटलचं देखील नुकसान करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. असं असलं तरी आता एक सकारात्मक बातमी समोर येतं आहे. ही बातमी वाचून तुमच्या देखील काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. एका डॉक्टरने रुग्णाचे प्राण कसे वाचले? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वाचा नेमकं काय घडलंय?
ही घटना बंगळुरूमधील असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव आहे. या डॉक्टरांनी जे केले ते समजल्यावर तुम्ही देखील या डॉक्टरचे आभार मानाल. सध्या या डॉक्टरांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
त्याचं झालं असं, मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑगस्टची असल्याच बोललं जातं आहे. गॅस्ट्रोएंटरोलॉजी सर्जन डॉ. नंदकुमार हे मणिपाल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी जात होते. मात्र त्यांची कार सरजापुर-मराठाहळ्ळीच्या वाहतूक कोंडीत अडकली. प्रचंड गर्दी असल्याने त्यांची कार तिथेच अडकून राहिली.
मात्र त्यांच्या एका रुग्णाची पित्ताशयाच्या पिशवीची सर्जरी करायची होती. तो रुग्ण ओटीमध्ये होता, त्याला भूल देण्यात आली होती. मात्र डॉ. नंदकुमार हे खूप वेळ रस्त्यावरच अडकून राहिले होते. मात्र काही काळानंतर डॉ. नंदकुमार यांनी कोणताही विचार न करता तिथून पळत जाण्याचा निर्णय घेतला.
डॉ. नंदकुमार यांनी आपली कार आहे तिथेच सोडली अन् हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटले. याबद्दल माध्यमांशी बोलताना डॉ. नंदकुमार यांनी म्हंटलं आहे की, जे रुग्ण शस्त्रक्रियेसाठी थांबले होते, ते सकाळपासून उपाशी होते. त्यांना शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही खाता येणार नव्हते. यामुळे मी माझ्या कारमधून बाहेर पडलो 45 मिनिटे धावलो.”
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! माजी आमदारासह तब्बल ५० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
Bachchu Kadu : बच्चू कडूंना राडा भोवला; कोर्टाने केली थेट कोठडीत रवाणगी, आता खावी लागेल जेलची हवा
Jayant Patil : महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?
स्कुल बसचालकाचा चिमुकलीवर बलात्कार, २४ तासांत आरोपीच्या राहत्या घरावर बुलडोझर!