आंध्रप्रदेश सरकारने त्यांच्या १३ जिल्ह्यांचे विभाजन करून २६ जिल्हे तयार केले आहेत. यातच नव्याने स्थापन झालेला कोनासीमा जिल्हा हिंसा, जाळपोळाने होरपळला आहे. आंध्रप्रदेश सरकारने कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्राथमिक आदेश काढला आहे.
नाव देण्यावरून काही स्थानिकांनी मोठा विरोध केला असून अनेक निदर्शने केली आहेत. आंदोलकांनी अमलापूरमचे आमदार आणि वाहतूक मंत्री पानीपे विश्वरूप यांचे घर पेटवून दिले. सुदैवाने पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढले होते. अमलापूरम हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे.
मन्निदिवरमचे आमदार सतिश यांच्या घरावर सुद्धा हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी इशारा दिल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात कडक बंदोबस्त लावला होता. १४४ कलम देखील लागू केले होते मात्र दुपारनंतर परिस्थिती चिघळली. आंदोलकांनी बॅरीगेट्स तोडून जाळपोळ सुरु केला.
त्यांनी ‘जय कोनासीमा’ घोषणा देत दगडफेक केली. त्यात २० पोलीस जखमी झाले आहेत. या हिंसाचारात ३ बसेस जाळल्या गेल्या आहेत. आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. मुख्यतः आंदोलनकर्ते हे तरुण होते.
आंदोलकांची मागणी आहे की, त्यांच्या जिल्ह्याच्या नावात इतर नावाचा समावेश केला जाऊ नये. आंदोलक इतके आक्रमक झाले होते की पोलिसांना त्यांना नियंत्रणात आणण्यात अपयश आले आणि हा मोठा हिंसाचार घडून आला. हे आंदोलन कोनासीमा जिल्हा साधन समितीच्या नेतृत्वात केलं जात आहे.
या घटनेनंतर गृहमंत्री टी. वनिता यांनी सांगितलं की, दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले आहेत. पुढे त्या असंही म्हटल्या की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करा. आंबेडकरांचं नाव जिल्ह्याला मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. आज नाम, नामांतर या मुद्यांहून घडून येत असलेल्या हिंसाचार, दंगलीमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येतो. अशा घटनांमध्ये तरुणांचा मोठा समावेश ही चिंतेची बाब म्हणता येईल.
https://twitter.com/ANI/status/1529115897843314688?s=20&t=_H1HMysPkCR9e0nKWsxHnQ
महत्वाच्या बातम्या
सलग दोन सिजन बेंचवरच बसून असलेल्या अर्जुनला वडील सचिन तेंडुलकरने दिला ‘हा’ सल्ला
क्वालिफायरची पहीलीच मॅच आणि पांड्याने केली ‘ही’ घोडचूक, झेलही सोडला अन्… ;पहा व्हिडीओ
तुमची सत्ता असताना झोपला होता का? OBC आरक्षणावरून पवारांनी फडणवीसांना खडसावले
सायकल सेकंड हॅंन्ड पण आनंद मर्सिडीज घेतल्यासारखा, तुफान व्हायरल होतोय चिमुकल्याचा व्हिडीओ