Share

राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर थांबला पाहीजे, ते कलमच रद्द करून टाका; शरद पवारांच्या मागणीने खळबळ

राणा दांपत्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेतील कलम १२४-अ अंतर्गत राजद्रोहाचे गंभीर कलम लावण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा कलम १२४- अ  चर्चेत आले आहे. या कलमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले महत्त्वाचे मतप्रदर्शन केले आहे. परंतु पवार यांनी केलेले मतप्रदर्शन हे केवळ राणा दाम्पत्यावरील कारवाईच्या अनुषंगाने नसुन ते संपुर्ण देशभरात या कलमाच्या गौरवापराच्या अनुषंगाने आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर विविध सूचना मांडण्याच्या उद्देशाने ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी हे मत मांडले आहे.

‘कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाची मुंबईतील सुनावणी ५ ते ११ मे या कालावधीत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील दालनात होणार आहे. त्यावेळी आयोगाने शरद पवार यांना ५ मे रोजी साक्ष नोंदण्यासाठी पाचारण केले आहे’, अशी माहिती सुनावणीत आयोगातर्फे बाजू मांडणारे अॅड. आशिष सातपुते यांनी दिली.

काय म्हणाले पवार, आपल्या प्रतिज्ञा पत्रात
‘राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी भादंवि आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यात (युएपीए) आवश्यक व योग्य त्या तरतुदी आहेत. त्यामुळे १२४-अ या कलमाचा गैरवापर कायदादुरुस्ती करून थांबवायला हवा किंवा ते कलम रद्द करायला हवे’, असे मत पवार यांनी मांडले आहे.

त्याचबरोबर अलीकडच्या काळात सोशल मीडियाचाही प्रचंड गैरवापर होत असल्याचे नमूद करत माहिती-तंत्रज्ञान कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचनाही पवार यांनी केली आहे. समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या हेतुने अपप्रचार पसरवला जाऊ शकतो. तसेच खोट्या बातम्या व अपप्रचाराच्या माध्यमातून समाजात धार्मिक, जातीय तेढ व गंभीर तणाव निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. यादृष्टीने संसदेला कायदादुरुस्तीची शिफारस करणे आवश्यक आहे’, असे नमूद करत तशी शिफारस करण्याची विनंती पवार यांनी आयोगाला प्रतिज्ञापत्रात केली आहे.

काय आहे कलम १२४-अ
भारतीय दंड संहिता ( आयपीसी ) च्या कलम २२४-अ मधील देशद्रोहाच्या परिभाषेनुसार , एखादी व्यक्ती जर सरकारविरोधी साहित्य लिहिते किंवा बोलते , अशा प्रकारच्या सामग्रीस पाठिंबा देते , राष्ट्रीय चिन्हांचा अवमान करून राज्यघटनेची बदनामी करण्याचा प्रयत्न करते तर त्याच्याविरोधात आयपीसीच्या कलम १२४-अ  अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो . जर देशविरोधी संघटनेविरूद्ध काही  संबंध असतील . जर त्याने कोणत्याही प्रकारे संघटनेचे समर्थन केले तर त्यांच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या
..तर हिंदू – मुस्लिम एकत्र येत त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील; शरद पवार ॲक्शन मोडमध्ये
२०१७ मध्येच होणार होती भाजप- शिवसेना – राष्ट्रवादीची आघाडी; भाजप नेत्याचे फोडले बिंग
24 वर्षांच्या ‘या’ खेळाडूला बनवा टिम इंडियाचा कर्णधार, युवराज सिंगने बोलून दाखवली मनातली इच्छा
बलात्कारांच्या आरोपांवर अभिनेता विजय बाबूचा पलटवार; म्हणाला मीच पीडित, पुरावे सुद्धा आहेत…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now