विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर त्याने प्रचंड धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने केवळ बंपर कमाईच केली नाही तर या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंतीही मिळाली. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची आणि त्यांच्यावर झालेल्या क्रूरतेची कहाणी या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. (the kashmir files banned in singapore)
‘काश्मीर फाइल्स’चे देश-विदेशात खूप कौतुक झाले. पण, या चित्रपटावरून बराच वादही होताना दिसून येत आहे. आता पुन्हा ‘द काश्मीर फाइल्स’वरून एक नवा वाद निर्माण झाला आहे. सिंगापूरमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की ‘द काश्मीर फाइल्स’ सिंगापूरच्या चित्रपटांच्या गाईडलाईन्समध्ये बसत नाही. त्यातून मुस्लिमांची एकतर्फी बाजू दिसून येते जी चिथावणी देत आहे. त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्था बिघण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटीने, संस्कृती, समुदाय आणि युवा मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सिंगापूरमध्ये तणाव निर्माण करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट सिंगापूरच्या चित्रपटांच्या गाईडलाईन्समध्ये बसत नाही.
अधिकाऱ्यांनी ‘न्यूज एशिया’ नावाच्या वाहिनीला सांगितले की ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये काश्मीरमधील संघर्षात हिंदूंचा छळ आणि अत्याचार दाखवले गेले आहे. यासर्व गोष्टी सिंगापूरच्या चित्रपटांच्या गाईडलाईन्समघ्ये बसत नाही. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या गोष्टी आणि इतर कृतींमुळे विविध समुदायांमध्ये वैर निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर समाजातील एकात्मतेला तडा जाण्याचीही शक्यता आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिंगापूरच्या चित्रपट वर्गीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेथील वांशिक किंवा धार्मिक समुदायांची बदनामी करणारा कोणताही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये दिसले होते. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. तसेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनाही एप्रिल २०२२ मध्ये ओहायोच्या सिनेटने सन्मानित केले होते.
महत्वाच्या बातम्या-
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंगांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, बाळासाहेबांनी उत्तर प्रदेशची…
नव्या ‘डिव्हिलियर्स’चा आयपीएलमध्ये दबदबा; लोक म्हणाले, ‘हा कॉमेंटेटर भारताला वर्ल्डकप जिंकून देणार’
पुन्हा ‘तो’ येतोय! महाराष्ट्रात जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट?; राजेश टोपेंचं मोठं विधान