Share

राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला; आघाडी विरोधात कोर्टात जाणाऱ्या भाजपलाच कोर्टाने झापले

fadanvis

राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केले आहे. मात्र राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल आणि सरकारमधले संबंध कायम चव्हाट्यावर आले आहेत. दोघांमधील दरी कमी होण्याची चिन्ह नाही.

याबाबत एका प्रकरणात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल आणि मुख्यमंत्री दोंघाच्या आपापसातील वादामुळे फटकारलं. महाराष्ट्राचे सध्याचे दुर्दैव असे की राज्यातील दोन घटनात्मक पदे म्हणजेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या सोबत नाहीत, असे न्यायालयाने म्हंटले आहे.

भाजपचे नेते गिरीष महाजन आणि जनक व्यास यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गोपनीय होण्याऐवजी आवाजी मतदानानं घेतली जावी या संदर्भात भाजपचे आमदार गिरीष महाजन यांनीही एक याचिका दाखल केली होती.

हायकोर्टाने गिरीश महाजन यांची याचिका फेटाळून लावली आहे. सोबतच जमा केलेले १० लाख जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमबदलाने लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असं महाजनांचं म्हणणे आहे.

पण असं असेल तर राज्यपालांनी १२ नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड केलेली नाही, मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का? असा प्रश्न कोर्टाने गिरीश महाजनांना विचारला आहे. आज मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

यावेळी कोर्टाने म्हंटले आहे की, “विधानसभेच्या अध्यक्षांबाबत लोकांना पडलेली आहे का? इथे बसलेल्या कितीजणांना लोकसभेचा अध्यक्ष कोण आहे हे माहित आहे? विधानसभा अध्यक्ष कोण असावा याने जनतेच्या हिताचे कसे उल्लंघन होते?,” असे सवाल न्यायालयाने उपस्थित केले.

दरम्यान, महाजन यांचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला. यावर हायकोर्टाने नराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात जनहित याचिका कशी दाखल होऊ शकते असा सवाल हायकोर्टाने केला आहे. यातून सर्वसामान्य जनतेचे काय नुकसान होत आहे, हे आम्हाला पटत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
दाऊदने फोन केला म्हणूनच मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने उडाली खळबळ
VIDEO: खेसारीलालचं ‘छू के छोड देला’ गाणं रिलीज, बेडरूममध्ये रोमांस करताना दिसले खेसारी-रक्षा
‘तारे जमीन पर’ फेम दर्शीललचा बदलला लुक, आता दिसतो खुपच हॅन्डसम, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
महाविकास आघाडी सरकारचा पलटवार, फडणवीसांसह भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्यांना अटक, राज्यात खळबळ

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now