विधानसभा निवडणुकीत भाजपकडून दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीत झालेला पराभव स्विकारत काँग्रेसने पुढील कार्यपध्दती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट पक्षाच्या नेतृत्वावरच जोरदार टीका केली आहे. गांधी कुटुंबाने आता पक्षाची धुरा इतरांकडे द्यावी असा सल्ला सिब्बल यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशासह इतर पाच राज्यात काँग्रेसच्या हाती अपयश लागले आहे. त्यामुळे सिब्बल यांनी आपला संताप व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 2014मध्ये सरकार आले. तेव्हापासून ते आतापर्यंत 177 खासदार आणि आमदारांसह एकूण 222 उमेदवार काँग्रेसला सोडून गेल्याचा दावा केला आहे. एखाद्या राजकीय पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेते सोडून गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. असे ही त्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे.
त्याचबरोबर, 2014 पासून काँग्रेसच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. प्रत्येक निवडणुकीत आम्ही एक एक राज्य गमावत आहोत. ज्या ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलो, त्या राज्यात कार्यकर्त्यांना सांभाळू शकलो नाही. अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षांतर केले असल्याची खंत सिब्बल यांनी व्यक्त केली आहे.
तसेच, निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना, पाच राज्यातील निवडणूक निकालामुळे मला जराही आश्चर्य वाटलं नाही. मला या निकालाचा अंदाज होताच. काँग्रेसने आता काँग्रेसची सुत्रे दुसऱ्याच्या हातात द्यावीत. असा सल्ला सिब्बर यांनी काँग्रेस अध्यक्षांना दिला आहे. सिब्बर यांनी काँग्रेसला केवळ 2.33 टक्के मते मिळाली असल्यामुळे पक्षाची निराशा झाल्याचे म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर, उत्तर प्रदेशातील काँग्रेसची ही इतिहासातील सर्वात खराब कामगिरी आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात सक्रिय असताना ही खराब कामगिरी झाली आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान काँग्रेसवर टीका करत, सीडब्ल्यूसीच्या बाहेरही एक काँग्रेस आहे. कृपया त्यांचे विचार ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तर… आमच्यासारखे अनेक नेते सीडब्ल्यूसीमध्ये नाहीयेत. मात्र काँग्रेसमध्ये पूर्णपणे एक वेगळा दृष्टीकोण आहे. त्याने काही फरक पडत नाही का? कारण आम्ही सीडब्ल्यूसीमध्ये नाही, देशभरात काँग्रेसी आहेत. सध्या गांधी कुटुंब कल्पनेत वावरत असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
मी उद्योपतीच्या पत्नीसोबत रात्र घालवत होतो अन् तो लांबून आम्हाला बघत होता; पूनावालाचा धक्कादायक खुलासा
रोहित शेट्टी गाजवणार बॉक्स ऑफिस! सिंघम 3 पासून सर्कसपर्यंत ‘हे’ 4 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “याची तर तोंड दाखवायची लायकी नाही”
सिनेमागृहानंतर आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास ‘द काश्मीर फाईल्स’ सज्ज; वाचा संपूर्ण डिटेल्स